PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video

P. V. Sindhu dance : कच्चा बदाम (Kacha Badam) या गाण्याची क्रेझ (Craze) कमी न होता वाढतच चालली आहे. देशभरातील तरूण-तरुणींवर गाण्याचा फीवर (Fever) चढला आहे. पीव्ही सिंधूनेदेखील कच्चा बदाम गाण्यावर डान्स करत सोशल मीडियावरील यूझर्सना आकर्षित केले आहे.

PV Sindhu : Badminton खेळाडूच नाही तर उत्तम Dancerही! सोशल मीडियावरचा Trend केला Follow, पाहा Video
कच्चा बदाम गाण्यावर डान्स करताना पीव्ही सिंधूImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 11:24 AM

P. V. Sindhu dance : कच्चा बदाम (Kacha Badam) या गाण्याची क्रेझ (Craze) कमी न होता वाढतच चालली आहे. देशभरातील तरूण-तरुणींवर गाण्याचा फीवर (Fever) चढला आहे. या गाण्यावर नाचल्याशिवाय रील पूर्ण होणार नाही, असेच जणू तरुणाईला वाटत आहे. केवळ तरूण-तरुणीच नाही तर सेलेब्रिटीदेखील या गाण्यावर ठेका धरत आहेत. खेळाशी संबंधित लोकांमध्येही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. आम्ही बोलत आहोत बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूबद्दल… आतापर्यंत तुम्ही पीव्ही सिंधूला बॅडमिंटन खेळून संपूर्ण जगात देशाचं नाव उंचावल्याचे पाहिले असेल, पण तिला डान्स करताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. पीव्ही सिंधूनेदेखील कच्चा बदाम गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यावर तिने आपल्या जबरदस्त डान्सने सोशल मीडियावरील यूझर्सना आकर्षित केले आहे. तिचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडला आहे.

डान्सच्या स्टेप्स फॉलो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पीव्ही सिंधू पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि ती सोशल मीडियावर कच्चा बदाम गाण्याचा ट्रेंडदेखील फॉलो करत आहे आणि तिने स्टेप्सची खूप छान कॉपीदेखील केली आहे. अशाप्रकारे ती बॅडमिंटन स्टार होण्यासोबतच उत्तम डान्सरही बनली आहे. तिने आपल्या डान्सच्या स्टेप्सने कच्च्या बदामाच्या नृत्याला सुरुवात केली. आता तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर धुराळा उडाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sindhu Pv (@pvsindhu1)

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर

पीव्ही सिंधूने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा डान्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 4.9 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्याच्या डान्सचे कौतुक केले, तर काही लोकांना तिचा डान्स आवडला नाही.

‘हे शोभत नाही’

एका यूझरने कमेंट करत लिहिले, की हे सगळे तुला अजिबात शोभत नाही, तर दुसर्‍या यूझरनेही तू काय केले, अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने लिहिले आहे, की ‘आप यूथ आइकन हो, सस्ते लोगों की ये सस्ती चीजें… आपके जैसे महान खिलाड़ी के लिए नहीं है’.

आणखी वाचा :

होय..! ‘ती’ सर्वकाही करू शकते, ‘या’ चिमुरडीला पाहून तुम्हीही हेच म्हणाल; Kid stunt video viral

‘मैं कॉफी पिती हूँ क्या पागल, नही चाहिए जा..!’ पण पुढे काय होतं? धमाल Video पाहा…

देशाची शान तिरंग्याचा जगभरात डंका; ‘हा’ Viral video पाहा, अभिमानानं छाती फुलेल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.