Video : शिकार करायची सोडली, आता म्हातारपणात फक्त खायचं, प्यायचं अन् झोपायचं! बिबट्या जगतोय राजासारखं आयुष्य

बिबट्या म्हणजे भीती, त्याचं चपळदार शरीर, धारदार नजर बघूनच अंगाचा थरकाप उडतो. पण तुम्ही कधी कापसाच्या गोळ्यासारखा मऊ आणि गुबगुबीत बिबट्या पाहिलायं का? याचा गुबगुबीतपणा हा खाऊन पिऊन जाडा झाल्यामुळे झालायं.

Video : शिकार करायची सोडली, आता म्हातारपणात फक्त खायचं, प्यायचं अन् झोपायचं!  बिबट्या जगतोय राजासारखं आयुष्य
| Updated on: Nov 28, 2026 | 3:18 PM

बिबट्या म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चपळ,चपळाईने झेप घेणारा आणि डोळे लवताच साव फाडणारा प्राणी. या बिबट्याला पाहिलंत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. , कारण हा इतका गोलमटोल झाला आहे की हा बिबट्या आहे की कापसाचा गोळा तेच कळेना. त्याचं नाव आहे बाओबाओ! त्याचा तो लठ्ठपणा पाहून सोशल मीडियावर तो चांगसाच व्हायरल झाला आहे. त्याला पाहून भीती तर कुठच्या कुठे पळून जाते आणि क्यूटनेस ओव्हरलँड होतोय.

भरपूर खाणपिणं आणि आरामात आयुष्य

चीनमधील पानझिहुआ प्राणीसंग्रहालयात पान बाओबाओ राहतो. तो आता 19 वर्षाचा आहे. त्याच्या गोलमटोल आणि जाड्या शरीरामुळे तो बिबट्या वाटेनासा झालाय.त्याचं पोट, मान आणि पाय यांच्याभोवती खूपच चरबी साचली आहे. त्यामुळे तो जास्त हालचालही करत नाही, मस्त एकदम मजेशीर आणि आरामात जगतो.

Loading...

तो आधीपासूनच जाडा बिबट्या या कॅटेगरीत येणारा प्राणी असावा. कारण 2024 मध्येही त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी झू मध्ये पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यानंतर त्याचे आता फोटो व्हायरल झाले .

 

त्याचं वजन कमी करण्यासाठी डाएटिंग

बाओबाचं वाढलेलं वजन पाहताना प्राणीसंग्रहलयातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी डाएट आखले होते.त्याच्या खाण्याचं प्रमाण कमी करण्यात आलं होतं. त्यासोबत त्याच्या हालचाली वाढवण्यावर भर दिला होता. पण त्याचा काही फायदा झाला नाही. मात्र त्याच्या वयाचा विचार करता त्याचं डाएटिंग बंद केलं.

19 वर्षांचं वय हे बिबट्यांसाठी वृद्धावस्थेचं मानलं जातं. या वयात जबरदस्तीने वजन कमी केल्यास ताण येऊ शकतो. त्यामुळे आता त्याचं वजन कमी करण्यापेक्षा त्याची सध्याची तब्येत चांगली ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

आता राजासारखं जगतोय बाओबाओ

प्राणीसंग्रहालयाच्या माहितीनुसार बाओबाओला रोज 500 ग्रॅमपेक्षा जास्त गोमांस दिलं जातं. त्याच्या आहारात चिकनचाही समावेश असतो. त्याला थोडी तरी हालचाल करता यावी यासाठी मोठा चेंडूही देण्यात आला आहे. तसेच त्याचं राहण्याचं ठिकाणही मोठं करण्यात आलंय.

विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या तपासणीत त्याची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आता त्याला वजन कमी करण्यासाठी त्रास देण्याऐवजी आरामात आणि आनंदात म्हातारपण घालवू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us