AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Job Viral Video : लाखोंची IT नोकरी सोडली, हातात घेतलं ऑटोचं स्टेअरिंग; IT पेक्षा ऑटो चालवताना मिळतंय जास्त पेमेंट

बंगळुरूमधील एका माजी IT कर्मचाऱ्याने वडिलांच्या निधनानंतर आईसोबत राहण्यासाठी कॉर्पोरेट नोकरी सोडून Rapido ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला. तिची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

IT Job Viral Video : लाखोंची IT नोकरी सोडली, हातात घेतलं ऑटोचं स्टेअरिंग; IT पेक्षा ऑटो चालवताना मिळतंय जास्त पेमेंट
viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 5:18 PM
Share

पॉश ऑफिस, कॉर्पोरेट नोकरी, प्रत्येक महिन्याच्या शेवटी हातात पडणारा बक्कळ, फिक्स पगार. अशी नोकरी सोडून कोणी चक्क ऑटो चालवायला लागलं तर? साहजिकच अनेकांना प्रश्न पडतील, लोक हसतील, चिडवतील… पण या सगळ्याची पर्वा न करता बंगळूरूमधील एका मुलीने IT मधला जॉब सोडून रिक्क्षा चालवण्याचे ठरवले. तिच्या करिअरपेक्षा तिने आपल्या एकट्या आईला सांभाळायचे ठरवले. तिची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर हा रिक्क्षातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. रिक्क्षा चालवणाऱ्या या महिलेशी रिक्क्षात बसलेली महिला संवाद साधत असते. त्या संवादाचा ती महिला व्हिडिओ रेकॉर्ड करते. बोलता बोलता समजलं की रिक्क्षा चालवणारी महिला याआधी IT क्षेत्रात काम करत होती. चांगला पगार होता. फिक्स ९ ते ५ ची नोकरी होती. सगळ काही सुरळित सुरू होतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉईंट आला ज्यामुळे तिने IT ची कॉर्पोरेट नोकरी सोडून हातात रिक्क्षाचं स्टेरिंग घेण्याच ठरवलं.

काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांच निधन झालं होतं. त्यात तिची IT कंपनीतील डे – नाईट शिफ्ट त्यामुळे आईला वेळ द्यायला वेळचं नव्हता. वडिलांच्या निधनांनंतर आई पुर्णपणे एकटी पडली होती. ज्या आईने आपल्याला वाढवलं, IT कंपनीत नोकरी करण्याइतपत शिकवलं त्या आईला आता आधाराची गरज असताना एकटं सोडणं तिच्या मनाला पटत नव्हतं. त्यामुळे ती अशा कामाच्या शोधात होती ज्यात चार पैसे ही मिळतील आणि आईच्या जवळही राहता येईल. त्यामुळे तिने रॅपि़डो रिक्क्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Tanvi👑 (@the_tanvishetty)

 

नातेवाईकांचा विरोध आजूबाजूच्या लोकांचे टोमणे

IT क्षेत्रातून थेट ऑटो ड्रायव्हिंगकडे वळण्याचा निर्णय हा सोपा नव्हता. तिच्या नातेवाईकांकडून तिला प्रचंड विरोध होता. मनस्तापही सहन करावा लागला. शेजारच्या लोकांनी खूप टोमणेही मारले पण अखेर तिने आपल्या आईसाठी ही नोकरी करण्याचे ठरवले.

IT पेक्षा जास्त कमाई होते

या महिलेने व्हिडिओत पँसेजरला सांगताना आपल्या रिक्क्षातून मिळणाऱ्या फायद्याविषयीही सांगितलं. तिच्या म्हणण्यांनुसार IT चालवण्याच्या कामातून तिला मानसिक शांतता आणि समाधान मिळतं. याशिवाय IT कंपनीच्या पगारापेक्षा दर दिवशी कमाईही जास्त होते.

तन्वी शेट्टी या कंटेट क्रिएटरने हा व्हिडिओ शूट केला असून तिने तो सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओत झळकणारे आईविषयीच्या प्रेमामुळे हा व्हिडिओ काही मिनिटांतच प्रचंड व्हायरल झाला. काही लोक आपल्याच आईला अडचण, त्रास, कटकट अडथळा समजून वृद्धाश्रमात ढकलतात. तर दुसरीकडे ही महिला जिने आपल्या आईसाठी IT ची नोकरीही सोडली. अनेक सोशल मिडिया यूजर्सने तिच्या या कामाचे प्रचंड कौतुक करत भरगोस प्रतिक्रिया आणि आर्शिवादही दिले आहेत.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...