AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयला मिळालं असं सरप्राईझ जे पाहून तरूण झाला भावूक, व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

ब्लिंकिटच्या एका डिलिव्हरी बॉयला एक अनोखं सरप्राईज मिळालं जे पाहून त्याला आपले अश्रू अनावर झाले. अचानक मिळालेल्या या मौल्यवान गिफ्टमुळे भावूक झालेल्या डिलिव्हरी बॉयचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.

Viral Video :   ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयला मिळालं असं सरप्राईझ जे पाहून तरूण झाला भावूक, व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
bilnkit delivery boy surprise Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 25, 2026 | 6:33 PM
Share

ऊन असो वारा असो किंवा पाऊस कोणत्याही परिस्थितीत दिवसभर उन्हातान्हात फिरायचं. ग्राहकांच्या घरी वेळेत सामान पोहोचवायचं. डिलिव्हरी बॉयचं काम वरवर पाहता सोपं वाटतं, पण त्यामागची मेहनत ही त्यांनाच माहित असते. अशा परिस्थितीत एखाद्या डिलिव्हरी बॉयच्या कामाची एखाद्याने दखल घेतली आणि त्याला एक सरप्राईज दिलं तर? त्याचा आनंद गगनात मावणार नाही, नक्कीच.

आता सोशल मीडियावर ब्लिंकिटच्या एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून त्या डिलिव्हरी बॉयलाच नव्हे तर नेटकऱ्यांनाही अश्रू अनावर झालेत.

सोशल मीडियावर या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हुसैन मन्सुरी नावाचे सामाजिक कार्यकर्ते दिसत आहेत.त्या ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉय सुजितला जाताना थांबवतात आणि त्याला विचारातात कि ‘डिलिव्हरीसाठी सायकल का वापरतोस ? बाईक किंवा स्कूटी का घेत नाहीस? त्यावर सुजित आपली आर्थित परिस्थिती सांगतो. कमी कमाई आणि वाढलेल्या खर्चामुळे वाहन खरेदी करणं शक्य नसल्याचं तो म्हणतो.

सुजित ऑर्डर देऊन आल्यावर त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. त्याला एका ठिकाणी नेलं जातं. पट्टी काढताच त्याच्यासमोर लाल रंगांची नवीन स्कूटी उभी असते. ही स्कूटी अनंत अंबानी कडून भेट असल्याचं मन्सुरी सांगतात. अचानक मिळालेले हे गिफ्ट पाहून सुजीत खूप भावूक होतो. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. आनंदाच्या भरात तो मन्सुरींना मिठी मारतो.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या मदतीचं कौतुक केलं आहे. अनंत अंबानी यांच्या फाउंडेशनशी संबंधित उपक्रमातून ही मदत करण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ता हुसेन मन्सुरी सांगतात.

हुसेन मन्सुरी हे सामाजिक कार्यकर्ता आहेत. ते अशा बऱ्याच गरजूंना मदत करत असतात. त्याचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे नेटकऱ्यांना त्यांचे कायमच कौतुक आहे. पण यात भर पडली ती अनंत अंबानीची, जेव्हा कळले ही मदत अनंत अंबानी फाउंडेशनशी संबंधित उपक्रमातून आहे, तेव्हा नेटकऱ्यांनी अनंत अंबानीलाही अनेक शुभाशिर्वाद दिले आहेत.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत