AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: स्कूटीवर भयानक स्टंट, तोल गेला आणि जीव जाता जाता राहिला, पाहा स्टंटचा लोटपोट करणारा व्हिडीओ

एक मुलगा स्कूटीने स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्याने आधी स्कूटीचा पुढचा भाग उचलण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच ब्रेक लावून स्टंट करण्याचा प्रयत्न केला, पण याच गोंधळात तो मुलगा सरळ बाईकच्या पुढे आपटला.

Video: स्कूटीवर भयानक स्टंट, तोल गेला आणि जीव जाता जाता राहिला, पाहा स्टंटचा लोटपोट करणारा व्हिडीओ
बाईकवर स्टंट करणं महागात
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 1:00 PM
Share

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. अनेकजण फेमस होण्याच्या नादत जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडले की, असा धोकादायक स्टंट करणार्‍याला हसावे की, अपघातग्रस्तासाठी प्रार्थना करावी हे कळालं नाही. ( Boy doing stunt on scotty then what happened next watch funny viral video)

आपल्याला हे जीवन मोठ्या कष्टाने मिळाले आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं ते पुरेपुर आणि आनंदाने जगलं पाहिजे. पण, अनेकजण त्याची पर्वा करत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. एक व्यक्ती त्याच्या जीवाशी कसा खेळ करत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘कोसास दे ला विडा’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला हे वृत्त लिहिपर्यंत दहा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा स्कूटीने स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी त्याने आधी स्कूटीचा पुढचा भाग उचलण्याचा प्रयत्न केला आणि लगेचच ब्रेक लावून स्टंट करण्याचा प्रयत्न केला, पण याच गोंधळात तो मुलगा सरळ बाईकच्या पुढे आपटला. मात्र, सुदैवाने पलीकडून येणारी वाहनं त्याच्या अंगावरुन गेली नाही. नाहीतर त्याला जीव गमवावा लागला असता.

हा व्हिडीओ पाहा-

लोक ही व्हिडीओ क्लिप फक्त शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. लोक स्कूटी चालकाला सूचना देऊ लागले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘याला म्हणतात, जोशात भान हरपणे’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे’. अजून एकाने लिहले, ‘हे लोक असंकाही करण्यापूर्वी पालकांचा विचार कसा करत नाहीत’. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. आता हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर दिसत आहे.

हेही पाहा:

Video: महिलेकडून कॅब ड्रायव्हरच्या जोरदार कानशिलात, नेटकरी म्हणाले, या महिलेवर कारवाई झालीच पाहिजे!

स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा भन्नाट डान्स स्टेप, आईसोबत पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.