AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stunt Video Viral : …आणि स्टंट करण्याच्या नादात थेट जमिनीवरच कोसळतो..! भावांनो, तुम्ही असं काही करू नका, नाहीतर…

फसलेल्या स्टंट(Stunt)चे अनेक व्हिडिओ तुम्ही याआधीही पाहिले असतील. त्यात व्हेरिएशन दिसून येईल. आता व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ (Video)पाहा. एका मुलाला भिंतीवर चढून परत फ्लिप (Flip) करणं कठीण जातं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलगा जमिनीवर डोकं सरळ ठेवून आपटतो.

Stunt Video Viral : ...आणि स्टंट करण्याच्या नादात थेट जमिनीवरच कोसळतो..! भावांनो, तुम्ही असं काही करू नका, नाहीतर...
तरुणाचा धोकादायक स्टंट
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 04, 2022 | 12:24 PM
Share

Stunt Video : चित्रपटांमध्ये नायकाला एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण की हे सर्व स्टंट प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली आणि सुरक्षेचे उपाय लक्षात घेऊन केले जातात. मात्र सोशल मीडियात लोकप्रिय होण्यासाठी काही लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागंपुढं पाहत नाहीत. फसलेल्या स्टंट(Stunt)चे व्हिडिओ तुम्ही याआधीही पाहिले असतील. त्यात व्हेरिएशन दिसून येईल. आता व्हायरल (Viral) होत असलेला हा व्हिडिओ (Video)पाहा. एका मुलाला भिंतीवर चढून परत फ्लिप (Flip) करणं कठीण जातं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलगा जमिनीवर डोकं सरळ ठेवून आपटतो आणि नंतर उठू शकत नाही. हा व्हिडिओ धक्कादायक आहेच पण आपटलेल्या मुलाच्या बाबतीत लोक रागही व्यक्त करत आहेत. प्रशिक्षकाच्या देखरेखीतच स्टंट करायचे असतात, याची आठवण देणारा हा व्हिडिओ लोक पसंत करत आहेत.

जीवघेणे स्टंट

काही सेकंदांचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा लोखंडी बोर्डच्या मदतीनं फ्लिप मारण्याचा प्रयत्न करतो. पण पुढच्या क्षणी आपलं काहीतरी वाईट होणार आहे, याची त्या मुलाला कल्पना नसते. तो मुलगा बोर्डवर चढतो आणि पाठीमागच्या फ्लिपवर आदळताच जमिनीवर कोसळतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्स अचंबित आहेत. या मुलाचा मृत्यू तर झाला नाही ना, असा सवालही काही लोकांनी अॅडमिनला केला आहे. त्याच वेळी, काहीजण म्हणतात, की मानेचं हाड तुटलं असावं, असंही अनेकजण म्हणत आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर parkour_extreme_youtube नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. हा आकडा संख्या सातत्यानं वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, बहुतेक यूझर्स मुलाची मान तुटल्याबद्दल बोलत आहेत. काहींनी तर या मुलाच्या प्रकृतीबाबत अॅडमिनला प्रश्नही केला आहे.

‘जीव जाईल असं काही करू नका’

एका यूझरनं कमेंट करताना लिहिलं, की मी खात्रीनं सांगू शकतो, की मुलाची मान तुटली असावी. त्याचवेळी आणखी एका यूझरनं कमेंट केली आहे, की भावांनो, तुमचा जीव जाईल असं काही करू नका. मला या मुलाची काळजी वाटते. दुसरा यूझर म्हणतो, की त्याची मान शंभर टक्के तुटली आहे. मात्र, लोकांच्या चिंताजनक कमेंट्स पाहून अॅडमिननंही मुलगा मजबूत असून तो बरा असल्याचं उत्तर दिलं आहे.

…आणि अशाप्रकारे आईनं पाहिले मुलीचे प्रताप! ‘हे’ इनक्रिप्डेट नाही!! Funny Video Viral

Video : NDA cadetsची ‘अशी’ही कलाकारी; गुणी कलावंतांना पाहून यूझर्सही म्हणतायत, ‘एका खोलीत इतकी प्रतिभा!

Kacha Badamवर Dance करणारी किती गोड आहे ही चिमुरडी! Viral झालेला ‘हा’ Video पुन्हा पुन्हा पाहाल

Follow Us
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप