AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bride groom : वधूसोबतचा ‘हा’ गोड क्षण वरानं केला कॅमेऱ्यात कैद, Video viral

Wedding video : वधू-वरांना (Bride groom) लग्नाच्या दिवशी त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करायला आवडते. लग्नाच्या दिवशी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पाणीपुरी (Panipuri) असतील तर प्रत्येकाला विशेषत: वधुला त्या खायच्या असतात. व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळाले.

Bride groom : वधूसोबतचा 'हा' गोड क्षण वरानं केला कॅमेऱ्यात कैद, Video viral
लग्नादरम्यान वधू-वरांचा टिपलेला क्षणImage Credit source: Instagram
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 01, 2022 | 2:38 PM
Share

Wedding video : वधू-वरांना (Bride groom) लग्नाच्या दिवशी त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करायला आवडते. कोणत्याही व्यक्तीचे लग्न ठरलेले असेल तर तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो. लग्नाच्या दिवशी वधू-वर यांना प्रत्येक आनंदात सहभागी होऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो. हे क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी कॅमेरामनला आधीच बुक केलेले असते. जिथे छायाचित्रकार पोहोचू शकत नाहीत, तिथे वधू किंवा वर स्वत: आपल्या मोबाइल कॅमेऱ्याने व्हिडिओ टिपणे पसंत करतात. असाच काहीसा प्रकार या व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा वराने गुपचूप वधूचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. होय, आपल्या सर्वांना माहित आहे की महिलांना पाणीपुरी आवडतात. तसा पाणीपुरी पदार्थ सर्वांनाच आवडतो, मात्र महिला जास्त आवडीने खातात. हा त्यांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक नक्कीच आहे. लग्नाच्या दिवशी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पाणीपुरी (Panipuri) असतील तर प्रत्येकाला त्या खायच्या असतात. असेच काहीसे या व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.

सर्व्ह केली पाणीपुरी

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की लग्नाच्या दिवशी नववधू जेवायला बसली असताना तिच्यासमोर पाणीपुरीही सर्व्ह केली जाते. नववधूने पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करताच तिच्याशेजारी बसलेल्या वराने सर्व काही आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. यादरम्यान नववधूची नजर अचानक कॅमेऱ्याकडे गेल्यावर ती हसायला लागली. मोठी नथ पाणीपुरीच्या आड येत होती. मग तिने नवरदेवाकडे पाहिले. नवरदेवानेही मग ती प्रेमाने बाजुला करत पाणीपुरी खाण्यातली वाट मोकळी करून दिली. वधू-वरांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर अपलोड

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. इन्स्टाग्रामवर kamakshi.kiwi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडिओ शेअर करताना ‘गोलगप्पे’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. इतर अनेक यूझर्सदेखील या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली.

View this post on Instagram

A post shared by Kamakshi? (@kamakshi.kiwi)

आणखी वाचा :

Viral : कॉमेडियनही आणि डान्सच्या रियालिटी शोचे विजेतेही, Volodymyr Zelenskyy यांचा ‘हा’ Dance video पाहिला का?

Dance funny video : ग्रुप डान्स करता करता अचानक गेला तोल, आणि…

Kacha Badam गाण्यावर थिरकला Paris boy; यूझर्स म्हणतायत, भावा, भारतात ये, कमालीचा Dance करतोस!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...