VIDEO | सापाला माकडाने बडवलं, फणा मारायला गेल्यावर तोंडावर मारली चापटं, पाहा व्हायरल व्हिडीओ

VIDEO | तावडीत सापलेल्या सापाला माकडाने धुतलं, सापाचं आक्रमण कसं थांबवलं पाहा व्हिडीओत, लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडला आहे, त्याचबरोबर लोकांनी कमेंट सुध्दा अधिक केल्या आहेत.

VIDEO | सापाला माकडाने बडवलं, फणा मारायला गेल्यावर तोंडावर मारली चापटं, पाहा व्हायरल व्हिडीओ
Snake viral video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 16, 2023 | 9:27 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे रोज नवे व्हिडीओ (New Viral Video) पाहायला मिळतात, त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात. असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका माकडाने सापाला (Snake viral video)चांगलच बडवलं असल्याचं तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल. अनेकदा सापाला पाहिल्यावर अनेकांना घाम फुटतो. त्याचबरोबर सापाचे आणि अन्य प्राण्यांचे भांडण आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट आणि लाईक सुध्दा केले आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे.

दोन साप एका ठिकाणी आहेत, त्याचवेळी तिथं एक साखळीने बांधलेलं माकडं आहे. हे माकडं दोन नागाच्या समोर अचानक उडी घेतं. त्यानंतर समोर असलेल्या सापाला चापट मारतो. माकडं वारंवार मारत असल्याचं लक्षात आल्यानंतर साप फणा काढतो आणि फणा मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी माकडं पुन्हा त्याला पकडून ठेवतं. त्यानंतर दुसरा साप माकडाला फणा मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे.


एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार माकडाने दोन्ही सापांची चांगलीचं धुलाई केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी व्हिडीओच्या खाली अनेक कमेंट केल्या आहेत.