अंबानींची सून असूनही इतका साधेपणा, राधिका मर्चंटच्या या कृतीने जिंकलं अनेकांचं मन

अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंट नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. अनंत आणि राधिका यांचा प्री वेडिंग सोहळ्यामुळे ते अधिक प्रकाशझोतात आले होते. आता राधिका मर्चंटचा साधेपणा समोर आला आहे. जे पाहून लोकं तिचं कौतूक करताना दिसत आहेत.

अंबानींची सून असूनही इतका साधेपणा, राधिका मर्चंटच्या या कृतीने जिंकलं अनेकांचं मन
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 4:26 PM

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै 2024 रोजी होणार आहे. हा संपूर्ण विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 3 दिवस चालणार आहे. याआधी राधिका-अनंतचे दोन भव्य प्री-वेडिंग फंक्शन्स झाले आहेत. ज्यामध्ये अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. इटलीतील एका आलिशान क्रूझवर या जोडप्याने कुटुंब आणि मित्रांसह आनंद साजरा केला. अंबानी कुटुंबाची सून राधिका मर्चंट लग्नाआधीच चर्चेत आहे. कधी लुकसाठी तर कधी तिच्यातील साधेपणामुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

राधिका-अनंत अंबानी यांचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  ज्यामध्ये अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका तिच्या होणारा पती अनंतसोबत तिच्या मित्राच्या लग्नात एन्जॉय करताना दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एका मित्राच्या लग्नात पोहोचले होते. यव्हायरल होत असलेल्या या फोटोत हे जोडपे मित्रांसोबत मस्ती करताना पाहू शकता. राधिका मर्चंटने तिची मैत्रीणीच्या लग्नाला खास हजेरी लावली.

दुसऱ्या प्री-वेडिंगनंतर राधिका आणि अनंत पुन्हा एकदा एकत्र दिसले. लग्नाच्या काही दिवस आधी अंबानी कुटुंबातील सून पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

राधिकाच्या साधेपणाने जिंकले मन

राधिका मर्चंटने ज्या प्रकारे आपल्या मैत्रीणीच्या लग्नाला हजेरी लावली. ज्या प्रकारे ती या लग्नात साधेपणाने वावरत होती. त्यावरुन ती सोशल मीडियावर चर्चेत आली. फोटोत अंबानी कुटुंबातील धाकट्या सुनेचा अतिशय साधा आणि सोबर लूक दिसत आहे. राधिकाचा साधेपणा पाहून लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत. अनंत अंबानीही सिंपल लूकमध्ये दिसली. राधिका मर्चंटने तिच्या मैत्रिणीच्या लग्नात पारंपारिक ड्रेस परिधान करून सर्वांची मने जिंकली. अंबानी कुटुंबातील सून पहिल्या चित्रात हलका हिरव्या रंगाचा सूट आणि दुसऱ्या चित्रात रंगीबेरंगी फुलांनी छापलेली साडी परिधान केलेली दिसत आहे.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.