VIDEO VIRAL : व्हिडिओ कॉलवर डिजिटल ‘रोका’! ऑनलाइन साखरपूडा करण्याची नवी पद्धत सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीने नवरा नवरीचा बघण्याचा कार्यक्रम अरेंज केला जातो इतपत ठीक होतं हे आपल्याला माहित होतं. पण आता नवरा नवरी समोर नसताना व्हिडिओ कॉलवर डिजिटल रोका पार पडलाय. त्याचाच व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

कोरोना काळात लग्नाच्या पद्धती विस्तारल्या. कमी माणसात लग्न उरकायचं, जास्त प्रवास करायचा नाही. या सगळ्या अटींमुळे कमी माणसांत लग्न होऊ लागली . मुलगी भारतात आणि मुलगा परदेशात अडकल्याने ऑनलाईन पद्धतीने साखरपूडे, बघण्याचे कार्यक्रम उरकू लागले. असाच एक साखरपुडा पार पडलाय पण यात गंमत म्हणजे नवरा नवरी दोन्ही वेगवेगळ्या देशात होते. म्हणून एकाला फोनवर व्हिडिओ कॉल करून तर दुसऱ्याला लॅपटॉप वर कॉल करून साखरपूडा पार पाडण्यात आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये मुलीकडचे आणि मुलाकडचे एका ठिकाणी जमलेले दिसत आहेत. पण त्यांची मुलं ज्याचं लग्न ठरलंय ती परदेशात आहेत. त्यामुळे पालकांनी एका ठिकाणी जमून आपल्या मुलांचा साखरपूडा पार पाडला आहे. लॅपटॉपच्या स्क्रिनवर नवरी मुलगी दिसते आहे. तर मोबाईलवर नवरा मुलगा पाहायला मिळत आहे. त्यांचे नातेवाईक लॅपटॉप आणि मोबाईललाच हळदी कुंकू लावत आहेत. आता या प्रकरणावर हसावं की रडावं हेच कळत नाही आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या यावर भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Online rishta pakka,😊 https://t.co/SA0u8QPJiC
— Saba Khan (@sabakhan21051) October 17, 2026
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींना काळानुसार बदलेला हा मार्ग वाटतोय सोयीचा मार्ग वाटतोय . तर काही यूजर्सना आता घटस्फोटही ऑनलाईनच होणार का असा मिश्किल सवाल केला आहे.
मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कुटुंबाबद्दल किंवा हा सोहळा नेमका कुठे पार पडला.याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत असला तरी त्यामागची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.
