AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईला म्हणे “लग्न लावून दे”, आवरा ह्याला!

आम्ही एका मुलाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यात तो मुलगा लग्नाचे फायदे सांगत आहे. हा गोंडस लहान मुलगा आपल्या आईला लग्न लावून देण्याची विनवणी करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा आपल्या आईला फोन करून लग्न करण्याची विनंती करत आहे. मुलगा म्हणतो, "आई, प्लीज माझं लग्न लावून दे." मग आईने विचारलं, "कुणाशी?"

आईला म्हणे लग्न लावून दे, आवरा ह्याला!
this baby wants to get marriedImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 15, 2023 | 4:52 PM
Share

मुंबई: मुला-मुलींच्या लग्नाचे किमान वय देशानुसार वेगवेगळे असते. लग्नामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि ते विविध समस्यांना तोंड देत आणि अडथळ्यांवर मात करत एकत्र आयुष्य जगू लागतात. मात्र लग्नाचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असते. लग्न करण्यामागे प्रत्येकाचे स्वतःचे कारण असते. आम्ही एका मुलाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यात तो मुलगा लग्नाचे फायदे सांगत आहे. हा गोंडस लहान मुलगा आपल्या आईला लग्न लावून देण्याची विनवणी करताना दिसतोय.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा आपल्या आईला फोन करून लग्न करण्याची विनंती करत आहे. मुलगा म्हणतो, “आई, प्लीज माझं लग्न लावून दे.” मग आईने विचारलं, “कुणाशी?” मुलगा म्हणाला, “एक मुलगी आहे, तिच्यासोबत.” जेव्हा त्याची आई विचारते की तुला का लग्न करायचे आहे तेव्हा मुलगा म्हणतो, “तुझ्यासाठी, ती आली की सगळं करेल”. आई विचारते नेमकं कुणासाठी लग्न करायचं आहे? तेव्हा मूल लगेच उत्तर देते, “स्वतःसाठी” आणि पुढे म्हणते, “तुझा नवरा आहे ना! मग तू त्यांच्याबरोबर आयुष्य जग ना, माझ्याबरोबर का राहते?” हा मुलगा आणि आई मधला मजेशीर संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे बोलता बोलता मुलगा म्हणतो लग्न केल्यावर माझी बायको मला म्हणेल, “पांडे जी रात्रीच्या जेवणात काय बनवू?” थोडा वेळ थांबून तो पुन्हा म्हणतो, “ती माझ्यासोबत लपाछपी खेळेल, काही दिवसांनी बाळ सुद्धा जन्माला येईल.” हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून मजेशीर कमेंट्स येत आहेत.

गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.