AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हातात बाटलीही पकडवेना, तरीही दारु पिण्याची हौस, तळीरामाचा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ व्हायरल!

या व्हिडिओ क्लिपमध्ये एक वृद्ध मद्यधुंद अवस्थेत टेबलाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. तो बाटलीतून वाइन ग्लासमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे हात थरथरू लागतात.

Video: हातात बाटलीही पकडवेना, तरीही दारु पिण्याची हौस, तळीरामाचा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ व्हायरल!
तळीरामाचा पोट धरुन हसवणारा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:52 PM
Share

सोशल मीडियाचं जग हे अद्भुत आहे. इथं दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधी आश्चर्यचकित व्हाल, तर काही पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसायला भाग पडेल. हा 1 मिनिट 5 सेकंदाचा व्हिडीओ एका दारुड्याचा आहे, जो आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला यूजर्सना खूप पसंती मिळत आहे. (Funny Video of old age man who want drink liqure but his hand shake very much drunker Shared by IPS Rupin Sharma will make you laugh lauder)

1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा आपल्या फॉलोअर्समध्ये मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करतो. युजर्सनाही त्याच्या पोस्ट खूप आवडतात. यामुळेच IPS शर्मा जेव्हाही एखादी पोस्ट शेअर करतात तेव्हा ती लगेच व्हायरल होते. सध्या त्याचा एक व्हिडिओ ट्विट चांगलाच व्हायरल होत आहे, जो दारूच्या व्यसनाशी संबंधित आहे. तुम्ही हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्याशिवाय राहू शकत नाही.

या व्हिडिओ क्लिपमध्ये एक वृद्ध मद्यधुंद अवस्थेत टेबलाजवळ उभा असल्याचे दिसत आहे. तो बाटलीतून वाइन ग्लासमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे हात थरथरू लागतात. दरम्यान, त्याच्याकडे कोणी पाहत नाही ना याचीही तो खात्री करतो. यानंतर, कसातरी ग्लासमध्ये दारू भरून तो तोंडाजवळ घेतो, परंतु पुन्हा हात थरथरत असल्याने तो पिऊ शकत नाही. हे दृश्य इतकं मजेशीर दिसतंय की ते पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच हसू येईल.

व्हिडीओ पाहा:

व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, दोन्ही हात आणि तोंड थरथरत आहेत, पण त्यानंतरही हा वृद्ध दारू पिण्याचा कसा प्रयत्न करत आहे. गंमत म्हणजे जेव्हा हा म्हातारा दारू पिण्यास अपयशी ठरतो तेव्हा तो बोटे बुडवून ती चाटू लागतो. हे खरोखर मजेदार आहे.

हेही पाहा:

Video: इम्फाळच्या आर्यन मॅनला महिंद्राचा मदतीचा हात, आता महिंद्रा विद्यापीठात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणार

Vir Das: भारतीयांबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन वीर दासवर होतेय जगभरातील भारतीयांकडून टीका

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.