AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नेटकऱ्यांकडून तिची पाठाराखण, ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

गीता यथार्थ यांच्या या फेसबुक पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडत आहेत. काहीजण त्यांना खालच्या भाषेत ट्रोल करत आहेत. | Geeta yatharth

महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नेटकऱ्यांकडून तिची पाठाराखण, ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर
सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 04, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई: सोशल मीडियावर दररोज विविध कारणांवरून वाद-प्रतिवाद सुरु असतात. सध्यादेखील सोशल मीडियावर एका महिलेल्या फोटोवरुन मोठा वाद रंगला आहे. या महिलेने बाथरूममध्ये (Bathroompic) कमोडवर बसलेला आपला फोटो शेअर केला होता. त्यानंतर फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे. (women sitting on commode going viral on social media)

भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असणाऱ्या गीता यथार्थ यांचा हा फोटो आहे. त्यांनी आपला टॉयलेट कमोडवर बसलेला फोटो फेसबुकवर शेअर केला होता. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही. त्यामुळेच आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.

सोशल मीडियावर ट्रोल

गीता यथार्थ यांच्या या फेसबुक पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडत आहेत. काहीजण त्यांना खालच्या भाषेत ट्रोल करत आहेत. हा फोटो म्हणजे अश्लिलता असल्याचे या संस्कृती रक्षकांचे म्हणणे आहे. हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज आहे, असा सवाल काही ट्रोलर्सनी त्यांना विचारला. तर काही लोकांनी यापेक्षाही खाली जात तुम्ही तुमच्या खासगी क्षणांचेही फोटो शेअर करा, अशी विकृत मागणी केली आहे.

गीता यथार्थ यांच्या मोहिमेला प्रतिसाद

गीता यथार्थ यांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केल्यानंतर अनेक महिलांनी आपले फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. #Bathroompic या हॅशटॅगचा वापर करून महिला त्यांचे फोटो शेअर करत आहेत.

‘फक्त एक दिवस लहान मुलांना सांभाळून दाखवा’

आपल्याकडे काहीजण अगदी स्तनपान करणाऱ्या महिलांकडेही वाईट नजरेने पाहतात. अशांना या फोटोमागील उद्देश काय कळणार? या फोटोमध्ये कोणतीही अश्लिलता नाही. फक्त एक दिवस पूर्णवेळ लहान मुलाला सांभाळून दाखवा. जेणेकरून एका आईला काय करावे लागते, हे तुम्हाला समजेल, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.

संंबंधित बातम्या:

आईपणाचं उदात्तीकरण म्हणजे महिलांचा छळ? महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर

Photo: टॉयलेटमधला फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असलेली गीता यथार्थ नेहमी का चर्चेत असते? नक्की वाचा, बघा!

(women sitting on commode going viral on social media)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ