VIRAL VIDEO : फटाक्यांसोबत स्टंट करायला गेली अन् पुढे जे घडलं ते पाहून पोटधरून हसले लोक
तरूणीने रॉकेट पेटवताना असा काही स्टंट केला की तो तिच्या जीवावर बेतला असता.त्यावरून पप्पा कि परी म्हणत त्या मुलीला चिडवलं जातं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिवाळी म्हटलं की फटाके फोडण्याचा उत्साह काही औरच असतो. पण मग त्यात येतात असे लोक ज्यांना फक्त फटाके फोडून समाधान मिळत नाही त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं असतं.मग हेच वेगळं करून दाखवणं कधी कधी अंगाशी देखील येतं जस या मुलीच्या अंगाशी आलंय. फटाके फोडताना तिने फटाक्यांसोबत अशी काही मस्ती केली आहे की तेच तिच्या अंगावर आले असते. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरूणी रॉकेट फटाक्याशी स्टंट करताना दिसत आहे. ती शांतपणे सुरूवातीला रॉकेट काचेच्या बॉटलमधून पेटवताना दिसत आहे. रॉकेट पेटवल्यानंतर स्टंट करायच्या नादात तिने त्या बॉटला लाथ मारली. लाथ मारल्यानंतर ती बॉटल त्या मुलीच्या दिशेने पलटी झाली. त्यामुळे ते रॉकेट पेटले आणि मुलीच्या दिशेने गेले. यात तिला गंभीर इजा झाली असण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण तरूणीच्या कृतीवर मजेशीर कमेंट्स करत आहेत, तर काही जण फटाक्यांसोबत अशा प्रकारचे प्रयोग करणं किती धोकादायक ठरू शकतं याकडे लक्ष वेधतं आहे. तर सोशल मीडियावर पप्पा कि परी म्हणून मज्जा घेतली जात आहे. असा स्टंट करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करायचा आणि फक्त निव्वळ काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी स्वत: चा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे. याचा विचार करायला हवा.
