AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bride On Bullet: बुलेटवाली नवरी! घोडी नाही, डोली नाही, गाडी नाही…ताई बुलेट चालवत थेट मंडपात!

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात नवरी मुलगी बुलेट चालवत मंडपात येते. या मुलीची स्टाईलच हटके आहे. मस्त मेकअप करून ही मुलगी बुलेट चालवते आणि मंडपात जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Bride On Bullet: बुलेटवाली नवरी! घोडी नाही, डोली नाही, गाडी नाही...ताई बुलेट चालवत थेट मंडपात!
Bride On Bullet goes viral Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 18, 2022 | 1:00 PM
Share

एक काळ असा होता की, नवरी (Bride) आपल्या भावी जोडीदाराकडे तिच्या लग्नात खूप लाजूनबूजून असायची. तितकीशी मोकळीक मुलींना नसायची. नवरदेव घोड्यावरून येत असे, पण आता काळ खरोखरच बदलला आहे. आता मुली शिकल्या, प्रगती झाली. मुली ती सगळी कामं सहज करताना दिसतात जी कामं मुलं करतात. आता नवरदेव काय नवरी सुद्धा घोड्यावरून येते. घोडा तर फार मागे पडला मुली आता गाड्या चालवत मंडपात येतात. साधी सुधी गाडी नव्हे बुलेट! हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात नवरी मुलगी बुलेट चालवत मंडपात येते. या मुलीची स्टाईलच हटके आहे. मस्त मेकअप करून ही मुलगी बुलेट (Bride Riding Bullet Goes Viral) चालवते आणि मंडपात जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडिओ

नववधूची स्टाइल!

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशी एक नवरी ड्रेसमध्ये बुलेट चालवताना दिसत आहे. मस्त स्टाइलमध्ये नवरदेव बुलेटवर बसून रस्त्यावर आपल्या स्टाइलने मजा करत असते. नववधूची ही स्टाइल पाहून काही जण अचंबित झाले, तर काही जणींना त्याची खूप आवड आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून असं दिसतंय की, नवरीने बुलेट चालवून लग्नस्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू जड लेहंगा घालून बुलेटवर बसलेली दिसत आहे, जवळच उभ्या असलेल्या आपल्या लोकांना लेहेंगा दुरुस्त करायला सांगत आहे, पण जर या सर्वांनी तिला सल्ला दिला किंवा कोणी काही बोलले तर तिने ‘होऊ दे यार’ असे म्हणते. यानंतर बुलेट सुरू केल्यानंतर बाइकवरून धावत ती लग्नस्थळाच्या दिशेने जाते.

स्वॅग म्हणजे काय?

व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की स्वॅग म्हणजे काय? आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘deera.makeovers’ नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी काही वेळातच हा व्हिडिओ पाहिला आहे. या एकाने लिहिलं, ‘लहेंगा चाकात अडकला तर सगळा स्वॅग रस्त्यावर येईल’.

Follow Us
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांची FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले?