VIDEO : सैनिकांच्या कार्यक्रमात जलवा तेरा जलवा…गाण्यावर तरुणीचा खास डान्स, पाहा व्हिडीओ!

भारतीय सैन्य शत्रूंशी दोन हात करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. भारतीय सैन्याने आतापर्यंतच्या युद्धात अनेक पराक्रम दाखवले आहे. शत्रू देश नेहमीच भारताच्या सैन्याला घाबरतात. भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाचा इतिहास साक्ष देतो. आजही भारतीय सैन्य म्हटलं तर शत्रू देशाच्या उरात धडकी भरते.

VIDEO : सैनिकांच्या कार्यक्रमात जलवा तेरा जलवा...गाण्यावर तरुणीचा खास डान्स, पाहा व्हिडीओ!
डान्स व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 11:59 AM

मुंबई : भारतीय सैन्य (Indian soldiers) शत्रूंशी दोन हात करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. भारतीय सैन्याने आतापर्यंतच्या युद्धात अनेक पराक्रम दाखवले आहे. शत्रू देश नेहमीच भारताच्या सैन्याला घाबरतात. भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाचा इतिहास साक्ष देतो. आजही भारतीय सैन्य म्हटलं तर शत्रू देशाच्या उरात धडकी भरते. देशभक्तीपर गीत कानावर ऐकू आल्यास अंगावर शहारा येतो.

जलवा तेरा जलवा गाण्यावर तरूणीचा डान्स 

भारतीय असल्याचा आणि भारतीय सैनिकांचा गौरव आणि अभिमान प्रत्येकाच वाटतो. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर नृत्य करतांना आपल्याला अभिमान वाटतो. तर मग अंगावर सैन्याची वर्दी असतांना सैनिकाला किती अभिमान वाटत असेल याचा अंदाज आपण करू शकतो. असाच भारतीय सैनिकांच्या एका कार्यक्रमात तरुणीने देशभक्तीपर गीतावर केलेल्या मनमोहक नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. कोणत्या कार्यक्रमामधील आहे हे निश्चित सांगता येणार नाही.

आपण या व्हिडीओमध्ये बघू शकतो की, एक तरूणी तेरा जलवा जलवा या गाण्यावर सुंदर डान्स करत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सैनिकही दिसत आहेत. या तरूणीचा डान्स बघितल्यानंतर कार्यक्रमामधील वातावरण देशभक्तीचे झाले आहे. या तरूणीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. तरूणीचा हा डान्स बघितल्यावर प्रत्येकाच्या अंगावर शहारा येत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : लांबसडक केस कापायला गेली तरुणी, अन् पार्लरमध्ये केसांनाच लावली आग, पाहा थरारक व्हिडीओ!

फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले 2021मधील हा सर्वोत्तम फोटो, पाहा नक्की काय आहे या फोटोमध्ये!