फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले 2021मधील हा सर्वोत्तम फोटो, पाहा नक्की काय आहे या फोटोमध्ये!

फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले 2021मधील हा सर्वोत्तम फोटो, पाहा नक्की काय आहे या फोटोमध्ये!
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो

सोशल मीडियावर कुठेली गोष्ट शेअर केली की, ती लगेचच व्हायरल होते. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या काही पोस्ट मजेदार तर काही प्रेरणादायी असतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 01, 2022 | 11:00 AM

मुंबई : सोशल मीडियावर कुठेली गोष्ट शेअर केली की, ती लगेचच व्हायरल होते. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या काही पोस्ट मजेदार तर काही प्रेरणादायी असतात. आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक हृदयस्पर्शी फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो बघितल्यानंतर लोक भावूक झाले आहेत.

तुम्ही म्हणालं आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये नेमके काय आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, हा या वर्षातील सर्वात आवडता फोटो आहे. पण मला माफ करा, कारण मला हा फोटो काढणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीती नाहीये. कोणीतरी हा फोटो इनबॉक्स केला आहे. मेहनत, जिद्द आणि आशा या फोटोतून समजू शकते. हेही जीवन आहे. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर लाइक्स आणि कमेंट्स या फोटोवर भरपूर मिळत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये वडील आणि मुलगा दिसत आहेत. हातगाडीजवळ वडील उभे राहिलेले दिसत आहेत आणि मुलगा हातगाडीच्या वर अभ्यास करत बसला आहे. हा फोटो हृदयाला भिडणारा आहे. या फोटोला 31 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 3 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. या फोटोवर कमेंट करत एका युसरने लिहिले की, सर या फोटोमध्ये गरिबी आणि लाचारीही दिसत आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, या फोटोमध्ये एक उम्मीद दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

Video : लग्नाच्या विधीत भटजींनी केला मोठा विनोद, नवरा-नवरीसह सगळेच पोट धरून लागले हसायला…

Viral video | माकड चाळे नक्की कशाला म्हणतात ‘हे’ पाहायचे आहे? मग हा व्हिडीओमध्ये बघाच!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें