‘ही OYO नाही, कॅब आहे, येथे रोमान्स नको’ टॅक्सी ड्रायव्हरची अजब सूचना
तेलंगणाच्या हैदराबाद शहरातील एक हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या टॅक्सीत एक पोस्टर लावले आहे. त्यात त्याने प्रेमी जोडप्यांना खास विनंती केलेली आहे.त्यामुळे हे पोस्टर चांगलेच व्हायरल झाले आहे.
सोशल मिडीयावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. सोशल मिडीयाची खास बाब अशी येथे कोणतीही गोष्ट मिनिटांत व्हायरल होऊ शकते. काही व्हिडीओ आणि फोटो पाहून लोकांना हसु आवरत नाही.तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. ते पाहून लोक हैराण होतात. अशात एका टॅक्सीचा चालकाचे मजेशीर पोस्टर व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर ते चर्चेचा विषय ठरले आहे. टॅक्सीत लावलेले हे पोस्टर अशासाठी व्हायरल होत आहे कारण टॅक्सीत बसणाऱ्या प्रेमी जोडप्यांसाठी त्यात एक प्रेमळ सूचना करण्यात आली आहे.
ट्रक चालक किंवा ऑटो चालक आपल्या वाहनांवर मजेशीर सूचना लिहीत असतात. त्यात कधी कधी शेरो शायरी असते तर कधी समाजातील जळजळीत वास्तव शब्दात व्यक्त केलेले असते. असाच हैदराबाद येथील एका टॅक्सीचालकाचा संदेश व्हायरल होत आहे.त्याने प्रवाशांसाठी आपल्या टॅक्सीत खास सूचना लिहीली आहे. या सूचनेप्रमाणे प्रेमी जोडप्यांना कॅबच्या आत रोमान्स करण्यास सक्त मनाई केली आहे. हा मजेशीर संदेश सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. त्याने टॅक्सीच बसणाऱ्या प्रेमी जोडप्यांना शिस्तीने प्रवास करायला सांगितले आहे. हे काही ओयो हॉटेल नाही असेही त्याने सुनावले आहे.
टॅक्सीत लावले पोस्टर
टॅक्सीत लावलेल्या पोस्टरमध्ये प्रेमी जोडप्यांना रोमान्स न करण्यासंदर्भात सावधान केलेले आहे. पोस्टरमध्ये लिहीलेय की ही एक कॅब आहे. कोणतीही खाजगी जागा नाही. किंवा ओयो हॉटेल नाही.तसेच पोस्टरमध्ये खाली लिहीले आहे की कृपया अंतर ठेवा आणि शांत बसा. ड्रायव्हरने हे पोस्टर अशा ठिकाणी लावले आहे, जेथून ते पाठी बसलेल्या लोकांना सहज दिसेल. कॅबमध्ये मर्यादा राखून प्रवास करा असे त्यात लिहीले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो
या टॅक्सीत बसलेल्या एका तरुणाने या सूचनेचा फोटो मोबाईलवर काढून सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. जो पाहाता..पाहाता प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोच्या व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.