या देशात रविवारी काम करणे आहे गुन्हा, केल्यास होते मोठी कारवाई, काय आहे कारण?

जगातील असा एक देश जिथे रविवारी काम करणे आहे गुन्हा. जर कोणी काम केलं तर होती मोठी शिक्षा. काय आहे परंपरा?

| Updated on: Mar 08, 2026 | 10:17 AM
1 / 5
जगातील अनेक देशांमध्ये रविवारी सुट्टी असते. मात्र काही ठिकाणी हा दिवस केवळ सुट्टीचा नसून धार्मिक परंपरेशीही जोडलेला आहे. प्रशांत महासागरात वसलेला छोटा द्वीपीय देश टोंगा हा त्याच्या अशाच एका कठोर नियमामुळे जगभर चर्चेत आहे. या देशात रविवारी काम करणे कायद्याने गुन्हा मानले जाते.

2 / 5
टोंगा देशाच्या संविधानानुसार रविवार हा पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कामकाज करण्यास परवानगी नसते. दुकान, कार्यालय, व्यावसायिक सेवा किंवा व्यापार यांसारख्या कोणत्याही व्यवसायिक विक्री रविवारी बंद ठेवणे बंधनकारक आहे.

3 / 5
जर कोणी व्यक्ती रविवारी दुकान उघडून व्यवसाय करताना किंवा इतर प्रकारचे काम करताना आढळली तर तिच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशा वेळी त्या व्यक्तीवर दंड आकारला जाऊ शकतो किंवा काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

4 / 5
या नियमाची अंमलबजावणी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून केली जाते. तसेच नागरिकांनी या नियमाचे पालन करावे अशी सतत आवाहनही केले जाते. पण यामध्ये रुग्णालये, पोलीस सेवा, वीज-पाणी पुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवा रविवारी सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

5 / 5
कारण या सेवा बंद ठेवणे लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. टोंगा देशातील बहुतांश लोकसंख्या ख्रिश्चन धर्माचे पालन करते. या धर्मात रविवार हा प्रार्थना, उपासना आणि विश्रांतीसाठी राखीव दिवस मानला जातो. त्यामुळे या धार्मिक परंपरेचा आदर राखण्यासाठीच असा कायदा करण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us