AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका संधीसाधू, रशियाच खरा मित्र… #IStandWithPutin ट्विटरवर ट्रेंड, Memes viral

Russia Ukraine war : रशियन लष्कराने कीवमधील (Kyiv) टीव्ही टॉवरही उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान, #IStandWithPutin ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. भारतातील एक मोठा वर्ग रशियाच्या पारंपरिक मैत्रीचा हवाला देत समर्थनात उतरला आहे. अमेरिका (America) संधिसाधू आहे, असे लोक म्हणत आहेत.

अमेरिका संधीसाधू, रशियाच खरा मित्र... #IStandWithPutin ट्विटरवर ट्रेंड, Memes viral
#IStandWithPutin ट्विटरवर ट्रेंडImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 02, 2022 | 6:16 PM
Share

Russia Ukraine war : गेल्या सात दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती अक्षरश: अवशेषांमध्ये रुपांतरीत झाल्या आहेत. रशियन लष्कराने कीवमधील (Kyiv) टीव्ही टॉवरही उद्ध्वस्त केला आहे. दरम्यान, #IStandWithPutin ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. भारतातील एक मोठा वर्ग रशियाच्या पारंपरिक मैत्रीचा हवाला देत उघडपणे त्याच्या समर्थनात उतरला आहे. अमेरिका (America) संधिसाधू आहे असे लोक म्हणत आहेत. संधी पाहून त्याने नेहमीच कोणाशीही हस्तांदोलन केले आहे, तर रशिया हा आपला खरा साथीदार आहे. त्यांनी भारताला प्रत्येक आघाडीवर साथ दिली आहे, असे सोशल मीडियावरील यूझर्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच ट्विटरवर #IStandWithPutin या हॅशटॅगचा महापूर आला आहे. या हॅशटॅगद्वारे लोक रशियाला भारताचा खरा मित्र सांगत आहेत.

अमेरिकेचा खरा चेहरा उघड

लोक कार्टून आणि मीम्स शेअर करत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे अमेरिकेच्या फसवणुकीचे बळी ठरले, असे एका यूझरने म्हटले आहे. शंभरपट बलाढ्य रशियाशी दोन हात करण्यासाठी त्याला प्रवृत्त केले गेले आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. इतर देशांतील युद्धाचा संदर्भ देत लोकांनी अमेरिकेचा खरा चेहरा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पाहू या काही निवडक मीम्स…

आणखी वाचा :

Fact Check Video : सैरावैरा धावणारी 11 वर्षाची मुलगी जागेवर खाडकन् कोसळली, ‘तो’ व्हिडिओ नेमका कुठला?

तब्बल 15 किलोमीटरपर्यंत आला स्फोटाचा आवाज, उरात धडकी भरवणारा खार्किवमधला Video viral

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.