AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : ना स्मार्ट क्लास ,ना प्रोजेक्टर ! केरळच्या आजींचा अनोखा शिकवणीचा वर्ग, नेटकरी म्हणाले ‘हिच खरी शिक्षणाची पद्धत’

आजकाळ शाळेत मुलांना शिकवायचं म्हटलं की स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर,डिजीटल स्क्रिन अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण राव एक काळ असाही होता की फळा, खडू आणि शिक्षक एवढंच शिक्षणासाठी पुरेसं होतं. केरळमधील एका वृद्ध शिक्षकांनी तर याआधीचीही शिक्षणाची पद्धत जपली आहे. ते म्हणजे वाळू द्वारे मुलांचे शिक्षण. त्यांचा मुलांना शिकवतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Viral Video : ना स्मार्ट क्लास ,ना प्रोजेक्टर ! केरळच्या आजींचा अनोखा शिकवणीचा वर्ग, नेटकरी म्हणाले 'हिच खरी शिक्षणाची पद्धत'
viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2026 | 3:01 PM
Share

आजकाळ शाळेत मुलांना शिकवायचं म्हटलं की स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर,डिजीटल स्क्रिन अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण राव एक काळ असाही होता की फळा, खडू आणि शिक्षक एवढंच शिक्षणासाठी पुरेसं होतं. केरळमधील एका वृद्ध शिक्षकांनी तर याआधीचीही शिक्षणाची पद्धत जपली आहे. ते म्हणजे वाळू द्वारे मुलांचे शिक्षण. त्यांचा मुलांना शिकवतानाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वाळूवर शिकवण्याची अनोखी पद्धत

आजच्या काळात विद्यार्थांना शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण प्रत्येक वेळी महागडी साधनं असलीच पाहिजे असं नाही. हे शिक्षकांच्या पद्धतीतून दिसतं. त्यांनी वाळूचा वापर करून मुलांना अक्षरं शिकवली. मुलांना रांगेत बसवलं आणि त्यांच्यासमोर वाळू ओतली. त्यावर त्यांना अक्षरं गिरवायला शिकवली. म्हणजे अक्षरं पुसटायची आणि गिरवायची सुद्धा. यात कोणाताही खर्च नाही.त्याशिवाय मुलांच शिक्षणही होतं.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत साधी असली, तरी त्यामागचा विचार महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी फक्त डिजीटल साधनांची गरज नसते. शिक्षकांची कल्पकता आणि शिकवण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची असते.

सोशल मीडियावर चर्चा

या ज्येष्ठ शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असून त्यांच्या शिकवण्याची पद्धातीचं कौतुक होत आहे. साध्या साधनांचा वापर करून विद्यार्थांना शिकवण्याची ही पद्धत अनेकांना भावली आहे. मात्र, या शिक्षकांचं नाव, शाळेचं ठिकाणं आणि व्हिडिओतील धड्याबद्दलची सविस्तर माहिती उपलब्ध नाही. शिक्षणासाठी मोठमोठी उपकरणं असली तर चांगलंच, पण विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि कल्पकता असेल, तर साध्या वाळूतूनही शिकण्याचा मार्ग तयार होऊ शकतो.म्हणूनच या शिक्षकाचा व्हिडिओ लोकांच लक्ष वेधून घेत आहे.

Follow Us
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी