AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti 800 ला बनवलं Rolls Royce, तेही फक्त 45 हजारात! चाचा चौधरी से तेज दिमाग, VIDEO

गाड्यांची क्रेझ कुणाला नाही? आजकाल तर जुन्या गाड्या मॉडिफाय करायची क्रेझ आहे. म्हणजे एखादी खूप खूप जुनी गाडी असेल तर तिचा रंग, ढंग सगळंच बदललं जातं. ही एक प्रकारची कलाच आहे म्हणायची. एखादी गाडी अशा पद्धतीने मॉडिफाय करायची की ती अगदी नवी कोरी वाटावी. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात तर मारुती 800 चं काय झालंय तुम्हीच बघा.

Maruti 800 ला बनवलं Rolls Royce, तेही फक्त 45 हजारात! चाचा चौधरी से तेज दिमाग, VIDEO
maruti 800 video viralImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 03, 2023 | 11:50 AM
Share

तिरुअनंतपुरम: मारुती सुझुकी फक्त भारतातच नाही तर अनेक देशात प्रसिद्ध आहे. ही गाडी 9 एप्रिल 1983 मध्ये भारतात आली. तुमच्या लहानपणी तुम्ही बघत असाल की समजा कुणी गाडी घेतली की ती मारुतीच असायची. मारुती 800 हे मॉडेल तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध होतं. लोकांना याचं खूप क्रेझ होतं. त्याकाळी ज्या देशात लोक पायी चालायचे, सायकल चालवायचे, फार फार तर रेल्वेने जायचे त्याकाळात आपल्या देशात लोक मारुती घेऊ लागले होते. भारतासाठी मारुती सुझुकी ही फार अभिमानाची गोष्ट होती. आता जेव्हा टाटाची नॅनो आली होती तेव्हा सुद्धा लोकांमध्ये अशीच उत्सुकता होती. त्यानंतर बऱ्याच चांगल्या गाड्या आल्या पण मारुती 800 आजही मनामनांत आहे.

किस्सा बघून लोक प्रचंड हैराण

मारुतीने सगळ्यांना इतकं वेड लावलं होतं की केवळ 2 महिन्यात 1.35 लाख गाड्यांची बुकिंग झाली होती. जस-जशी वेळ पुढे गेली तस-तसं या गाडीत बदल होत गेले पण तरीही या बदलांसहित ही गाडी लोकांच्या पसंतीस उतरत होती. आजही ही गाडी अनेक लोकांकडे आहे पण आता जुन्या गाडा मॉडिफाय केल्या जातात. गाडीचा लूक पूर्णपणे बदलून टाकणे, गाडी मॉडिफाय करणे याची एक वेगळी क्रेझ सध्या लोकांमध्ये आहे. असाच एक किस्सा समोर आलाय जे बघून लोक प्रचंड हैराण झालेत.

व्हिडीओ व्हायरल

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मारुती 800 ला मॉडिफाय केलेलं आहे ही गाडी बघून तुम्हाला धक्काच बसेल. केरळच्या हदीफ नावाच्या एका मुलाने आपल्या युट्युब चॅनल ट्रिक्स ट्यूब वर गाडीचे डिटेल्स शेअर केलेले आहेत. यात त्याने गाडी मॉडिफाय का करावी वाटली हे सुद्धा सांगितलंय.

हा चमत्कार त्याने फक्त 45 हजारांमध्ये

ही कार कुणाची आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही. कारच्या पुढच्या बाजूला मोठ्या आकाराचं ग्रील लावण्यात आलंय. या ग्रीलमुळे ही गाडी रोल्स रॉयससारखी दिसतीये. हा चमत्कार त्याने फक्त 45 हजारांमध्ये केलाय. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की जर तुम्ही हे वाहन कुठे घेऊन गेलात तर तुम्हाला पकडलं जाऊ शकतं. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि तुमचे वाहन जप्त सुद्धा केले जाऊ शकते.

Follow Us
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...