Police Dance Video : बाई, बाटली अन् छमछम…वर्दी विसरून पोलिसाचे नर्तिकेसोबत चाळे, संतापजनक व्हिडीओने खळबळ!
Police Dance Video : पोलिसांच्या वर्दीचे अनेक नियम असतात. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिसाचे एका नर्तिकेसोबतचे चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तर संतापजनक व्हिडीओ सर्वत्र खळबळ माजली आहे.

Police Dance Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही असे व्हिडीओ असतात, ज्यामुळे वादग्रस्त परिस्थितीस तयार होते. आता देखील असंच काही झालं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा महिला सोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी लाजपत नगर पोलीस ठाण्यात अतिरिक्त ठाणे प्रभारी (एटीओ) म्हणून कार्यरत असलेले इन्स्पेक्टर अमित प्रकाश असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमित प्रकाश यांच्यावर अनेकांनी टीका केलीय या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत त्यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये इन्स्पेक्टर अमित प्रकाश एका महिलेसोबत डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ कोणत्याही अधिकृत कार्यक्रमातील नसून रोहिणी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका वाढदिवसाच्या समारंभातील असल्याचे सांगितलं जात आहे. हा कार्यक्रम अमित प्रकाश यांच्या मित्राचा असल्याची माहितीही समोर आली आहे.
व्हिडिओमध्ये अमित प्रकाश हे साध्या वेशात दिसत असून, समारंभात उपस्थित असलेल्या अन्य लोकांच्या उपस्थितीत महिलेसोबत वेगवेगळ्या अंदाजात डान्स करताना दिसतात. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांपैकी कोणीतरी त्यांच्या डान्सचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाची चर्चा रंगली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.
एवढंच नाही तर, व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यानुसार मंगळवारी इन्स्पेक्टर अमित प्रकाश यांना लाइन हजर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांना रात्री उशिरापर्यंत पोलीस लाइनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना पोलीस लाइनमध्येच रिपोर्ट करावे लागणार आहे.
दरम्यान, इन्स्पेक्टर अमित प्रकाश यांना लाइन हजर करण्यामागील नेमकं कारण दिल्ली पोलिसांकडून अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसेच या व्हिडिओच्या अनुषंगाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू होणार आहे का किंवा पुढील कोणती कारवाई केली जाणार आहे, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.