Viral video : सुपर से भी ऊपर! ‘या’ मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility

प्रदीप गरड

|

Updated on: Mar 05, 2022 | 10:26 AM

little girl stunt video : एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालेला पाहायला मिळाला, एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुलीची लवचिकता (Flexibility) पाहून ते रबराचे (Rubber) बनलेले आहे की काय, असा प्रश्न पडतो.

Viral video : सुपर से भी ऊपर! 'या' मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility
लवचिक शरीराद्वारे अप्रतिम हालचाली करताना मुलगी
Image Credit source: Instagram

little girl stunt video : इंटरनेटच्या विश्वात आपल्यातले कौशल्य, प्रतिभा ओळखणे आणि ते जगासमोर आणणे खूप सोपे झाले आहे. हुशार मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजकालची मुले इतकी कौशल्यपूर्ण आहेत की त्यांचे अनेक गुण, अप्रतिम स्टंट नेहमीच आपण अनुभव करत असतो. आजकालच्या मुलांचे हे कौशल्य पाहून आपण विचार करायला लागतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालेला पाहायला मिळाला, ज्यामध्ये एका मुलीने असा पराक्रम करून दाखवला, ज्याला पाहून बडे स्टंटमनही थक्क होतील. एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मुलीची लवचिकता (Flexibility) पाहून ते रबराचे (Rubber) बनलेले आहे की काय, असा प्रश्न पडतो. मुलीची ही कला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

मुलीच्या टॅलेंटने सर्वच थक्क

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी खुर्चीवर बसलेली दिसत आहे, तिच्याकडे बघून कोणीतरी उलटे बसले आहे, असे दिसते. पण मुलगी मागे वळून पाहताच या मुलीच्या टॅलेंटने सर्वांनाच हैराण केले. आपण विचार करायला लागतो. या मुलीचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतो. ही मुलगी इतक्या कमी वयात असे स्टंट कसे करू शकते, असा विचार नक्कीच मनात येतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा अप्रतिन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 10 हजारांहून अधिक लाइक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की ही ‘स्त्री’ काहीही करू शकते.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘ये टैलेंट वाकई सुपर से भी ऊपर है.’ दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘कदाचित मीही हे करू शकले असते. परीक्षेत कामाला आले असते. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Video Nation (@nation.video)

आणखी वाचा :

Video : “झुंड”चं सैराट प्रमोशन, नागराज “आण्णां”नी बडवली हलगी, आर्ची, परश्याचा भररस्त्यात झिंगाट डान्स!

VIDEO : तरूणाची हायवेवर खतरनाक स्टंटबाजी, नेटकरी म्हणाले…भाऊ जर अशीच बाईक चालवलीस तर लवकरच यमराजला भेटशील!

Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI