Video | “घराच्या गेटला काळा रंग का दिला ?” लखनऊच्या ‘त्या’ तरुणीचे शेजाऱ्यांसोबत भांडण, नवा व्हिडीओ व्हायरल

लखनऊच्या तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी आपल्या शेजारांना घराच्या गेटच्या रंगावरुन भांडत आहे.

Video | घराच्या गेटला काळा रंग का दिला ? लखनऊच्या त्या तरुणीचे शेजाऱ्यांसोबत भांडण, नवा व्हिडीओ व्हायरल
priyadarshini viral video
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 9:44 AM

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला भररस्त्यात मारल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. मागिल काही दिवसांपासून याच कारणामुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तरुणीला अटक केली जावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर याच तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी आपल्या शेजाऱ्यांना घराच्या गेटच्या रंगावरुन भांडत आहे. (Lucknow girl fighting with her neighbour old video went viral on social media)

लखनऊच्या तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

लखनऊ येथे कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या तरुणीचे नाव प्रियदर्शिनी यादव असून काही दिवसाांपून ही तरुणी चांगलीच चर्चेत आहे. तिने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ट्रेंडखाली लोकांनी प्रियदर्शिनी या तरुणीला अटक केली जावी अशी मागणी केली होती. मात्र, आता याच तरुणीचा आणखी एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या शेजाऱ्यांना जोरजोरात भांडताना दिसत आहे.

घराच्या गेटच्या रंगावारुन तरुणीचे भांडण

ही तरुणी आपल्या शेजाऱ्यांची जोरजोरात भांडत असल्यामुळे येथे लोकांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये व्हिडीओतील तरुणी तिच्या शेजाऱ्यांवर ओरडताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या गेटला काळा रंग दिला आहे. याच काळ्या रंगामुळे या परिसरात आंतरराष्ट्रीय ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे या लोकांनी त्यांच्या गेटला काळा रंग देणे बरोबर आहे का ? असा प्रश्न ती विचारताना दिसत आहे.

पोलीस तिला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे

ही तरुणी शेजाऱ्यांशी भांडत असताना बाजूचे लोक तसेच एक पोलीस तिला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गेटच्या रंगावरुन ही तरुणी भांडत असल्यामुळे बाजूचे लोक हसत आहेत. व्हिडीओत दिसणारा पोलीस या तरुणीला घरी जाण्यास सांगत आहे, मात्र ती ऐकत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल झालेल्या प्रयदर्शनीचा हा जुना व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून जोरजोरात हसत आहेत.

इतर बातम्या :

Video | लाईव्ह रिपोर्टिंदरम्यान पाण्यात बुडाली कार, थरार कॅमेऱ्यात कैद

Video | पाकिस्तानी लोकांचा भलताच खेळ, व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

(Lucknow girl fighting with her neighbour old video went viral on social media)