Video | पाकिस्तानी लोकांचा भलताच खेळ, व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

Video | पाकिस्तानी लोकांचा भलताच खेळ, व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
PAKISTAN FUNNY GAME

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय थरारक असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अतिशय मजेदार आहे. पाकिस्तानी तरुणांच्या या व्हिडीओला पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. (Pakistani boys playing funny game of beating with chappal video went viral on social media)

खेळात एकूण चार तरुण सहभागी झाले

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुण एक मजेदार खेळ खेळत आहेत. या खेळात एकूण चार तरुण सहभागी झाल्याचे दिसत आहे. यापैकी दोन तरुण पाय दूर करुन एकमेकांकडे पाठ करुन उभे आहेत. हातांच्या मदतीने त्यांनी एकमेकांना घट्ट पकडले आहे. तर बाकीचे दोन तरूण खेळ खेळताना मजेदार करामती करत आहेत.

दोन तरुण एकमेकांना चपलेने मारत आहेत

पाय दूर करुन उभे राहिलेल्या तरुणांच्या पायांमधून बाकीचे दोन तरुण पळून जाण्याचा खेळ खेळत आहेत. जो तरुण पायांच्या मधून सर्वात आधी निघेल तो दुसऱ्या तरुणाला चपलेने मारत आहे. तसेच ज्या तरुणाने चपलेने मार खाल्ला आहे. तो तरुण लगेच पायांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असून तो दुसऱ्या तरुणाला चप्पल मारण्याचा प्रयत्न करत आहे. चप्पल मारामारीचा हा खेळ नेटकऱ्यांना चांगाच आवडला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा खेळ खेळणाऱ्या तरुणांना तर ऑलिम्पिमध्ये संधी द्यायला पाहिजे अशी मजेदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा खेळ कोणता आहे, याबाबत माहिती नाही. मात्र तो अतिशय़ मजेदार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

VIDEO | ‘एक बार चेहरा हटा दें शराबी’ गाण्यावर नवरा-नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी हसून बेजार

Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(Pakistani boys playing funny game of beating with chappal video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI