Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.ज्यात हा प्रवासी ओरडताना दिसत आहे. त्याने दोन महिला फ्लाइट अटेंडंट्ससोबत गैरवर्तन केलं आणि ओरडायला सुरुवात केली. (Viral Video: Passenger abused Flight attendant, They tied up him on plane)

Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं

मुंबई : जगभरातील सर्व विमान कंपन्यांकडे प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाइट अटेंडंट (Flight Attendant) असतात. त्यांना मराठीत परिचारक असं म्हणतात. हे परिचारक प्रवाशांच्या सुखसोयीची पूर्ण काळजी घेतात, मात्र अनेकदा लोक विमानात त्यांच्याशी गैरवर्तन करतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.असाच आणखी एक प्रकरण नुकतंच उघडकीस आलं, जिथं अमेरिकेच्या फ्रंटियर एअरलाइन्समधील एका व्यक्तीनं एका महिला फ्लाइट अटेंडंटला अयोग्य स्पर्श केला. त्यानंतर हे प्रकरण खूप वाढलं.

या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.ज्यात हा प्रवासी ओरडताना दिसत आहे. त्याने दोन महिला फ्लाइट अटेंडंट्सच्या स्तनांना स्पर्श केला आणि ओरडायला सुरुवात केली, “माझ्या पालकांकडे 2 दशलक्ष डॉलर्स आहेत.” यासोबत त्याने आणखी एका फ्लाईट अटेंडंटला मारहाणसुद्धा केली. मॅक्सवेल विल्किन्सन बेरी नावाच्या या व्यक्तीचे वय 22 वर्षे सांगितलं जात आहे. मियामी-डेड पोलीस विभागानेही या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पॅसेंजरशॅमिंग नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Passenger Shaming (@passengershaming)

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की बेरी क्रू मेंबर्सना शिवीगाळ करत होता आणि सतत त्यांच्यावर ओरडत होता. तो एका व्यक्तीला मारण्याचा प्रयत्नही करतो. पेय प्यायल्यानंतर, तो केबिनमध्ये शर्टविरहित चालायला लागतो. हे विमान अमेरिकेच्या मियामी येथे उतरणार होतं, त्यामुळे क्रू सदस्यांनी एकत्र त्याला टेपनं सीटवर बांधले. यावेळी त्याचं तोंड देखील बांधले गेलं.

या प्रकरणात, बेरी म्हणतो की हा त्याच्या आयुष्यातील सर्वात अमानुष अनुभव होता. बऱ्याच लोकांनी त्याची खिल्ली उडवली. त्याने व्यावसायिक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्यावर अन्याय झाल्याचं ट्वीट केलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मॅक्स बेरीचं ट्विट

This will forever be the most dehumanizing experience in my entire life. Many people laughed and ridiculed me as I was mistreated by staff of a PROFESSIONAL airline. Just to make matters worth this has gone “viral” on the internet and will never disappear. My life will never be https://t.co/ucf5YnnfJY

— Fuck max berry (@maxberry1998) August 4, 2021

संबंधित बातम्या

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या किलर अदा, साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर

Top 5 News | लारा दत्ताच्या ‘इंदिरा’ लूकवर चाहते फिदा, जखमी साराने मागितली आई-वडिलांची माफी, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी!

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री, प्रेक्षकांकडूनहे होतंय कौतुक!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI