Top 5 News | लारा दत्ताच्या ‘इंदिरा’ लूकवर चाहते फिदा, जखमी साराने मागितली आई-वडिलांची माफी, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी!

जर तुम्ही बुधवार म्हणजेच 4 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | लारा दत्ताच्या ‘इंदिरा’ लूकवर चाहते फिदा, जखमी साराने मागितली आई-वडिलांची माफी, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी!
Top 5 News
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 10:36 AM

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही बुधवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही बुधवार म्हणजेच 4 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का?

सगळेच चाहते अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षयने (Akshay Kumar) या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. ट्रेलरमध्ये लारा दत्ता(Lara Dutta)  न दिसल्यानंतर अभिनेत्री चित्रपटात का दिसत नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

मात्र, जेव्हा ट्रेलर लाँच करण्यात आला, तेव्हा लाराने खुलासा केला की ती या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये चाहते तिला ओळखूच शकले नाहीत. लाराचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहेत. लाराच्या या लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मेकअप आर्टिस्टचे कौतुक केले जात आहे.

‘रंग दे बसंती’च्या ‘या’ भूमिकेसाठी अभिषेक-फरहानचा नकार, हृतिक रोशनची मनधरणी करण्यासाठी घरी गेलेला आमिर खान!

चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakesh Omprakash Mehra) यांचा ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) हा सुपरहिट चित्रपट कोण विसरू शकतं? एका अनोख्या आणि नवीन विषयावर बनवलेला हा चित्रपट आजही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट रिलीज झाल्याच्या इतक्या वर्षांनंतर, निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी खुलासा केला की, आमिर खानने (Aamir Khan) बॉलिवूडच्या ‘रंग दे बसंती’ या आयकॉनिक चित्रपटात हृतिक रोशनला (Hritik Roshan) कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

चित्रपट निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, आमिरने हृतिकला ‘करण सिंघानिया’ची भूमिका करण्यासाठी खूप मनधरणी केली होती. पण, तरीही हृतिक सहमत झाला नाही आणि त्याने हा चित्रपट नाकारला. अशा परिस्थितीत, शेवटी चित्रपटात ही विशेष भूमिका दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला देण्यात आली, जी चाहत्यांदेखील खूप आवडली.

‘सॉरी अम्मा, अब्बा…’, जखमी झालेल्या सारा अली खानने का मागितली कुटुंबाची माफी?

अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई-वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचीही माफी मागितली आहे. एवढेच नाही तर मी नाक कापले, असेही सारा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया साराने असे काय केले की तिला तिच्या पालकांची माफी मागावी लागली…

अभिनेत्री सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना साराने लिहिले, ‘सॉरी अम्मा, अब्बा आणि इग्गी. मी माझे नाक कापले.’ साराचा हा व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेले विचित्र कॅप्शन पाहून चाहते खरोखरच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचे नाक कापून घेतले म्हणजे तिच्या नाकाला दुखापत झाली, असा त्याचा अर्थ आहे. साराने आपल्या मजेदार पद्धतीने ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे.

किशोर कुमारांची झाली होती 4 लग्न, त्यातील एक आता मिथुन चक्रवर्तींची पत्नी!

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच गोंधळलेले होते. किशोर कुमार यांचे एकूण चार विवाह झाले. त्यांचे चौथे लग्न लीला चंदावरकर यांच्याशी झाले. किशोर कुमार हे त्यांची चौथी पत्नी लीला चंदावरकर यांच्यापेक्षा जवळपास 20 वर्षांनी मोठे होते. चौथ्या लग्नाच्या वेळी ते 51 वर्षांचे होते. दोघे ‘प्यार अजनबी है’ च्या सेटवर भेटले. त्यांचे पहिले लग्न रुमा घोष, दुसरे लग्न मधुबाला, तिसरे लग्न योगिता बाली आणि चौथे लग्न लीला चंदावरकर यांच्याशी झाले. किशोर कुमारपासून विभक्त झाल्यानंतर योगिता बालीने मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले.

अखेर अनिरुद्धपासून घटस्फोट घेऊन, ‘पत्नी’च्या भूमिकेतून मुक्त होऊन सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. ‘समृद्धी’ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन आता आई पुन्हा एकदा तिच्या माहेरी निघाली आहे.

हेही वाचा :

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री, प्रेक्षकांकडूनहे होतंय कौतुक!

यो यो हनी सिंह आणि वादांचं जुनं कनेक्शन, पाहा आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकलाय गायक!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.