यो यो हनी सिंह आणि वादांचं जुनं कनेक्शन, पाहा आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकलाय गायक!

आता हनी सिंहची गाणी क्वचितच ऐकली जातात. पण एक काळ असा होता, जेव्हा हनी सिंहने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा चित्रपट आणि अनेक मोठ्या चित्रपटांसाठी गाणी गायली होती.

यो यो हनी सिंह आणि वादांचं जुनं कनेक्शन, पाहा आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकलाय गायक!
हनी सिंह

मुंबई : हनी सिंह (Yo Yo Honey Singh) हा असा एक रॅपर आहे, ज्याने संगीत विश्वात खूप नाव कमावले. वयस्क लोकांना हनी सिंहची गाणी अजिबात आवडत नाहीत, तर दुसरीकडे त्याचे रॅप नेहमीच तरुणांच्या जिभेवर रेंगाळत असतात. मात्र, आता हनी सिंहची गाणी क्वचितच ऐकली जातात. पण एक काळ असा होता, जेव्हा हनी सिंहने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा चित्रपट आणि अनेक मोठ्या चित्रपटांसाठी गाणी गायली होती. त्याच्या ‘लुंगी डान्स’ या गाण्याने त्याला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली की, एका रात्रीत तो अनेक दिग्दर्शक-निर्माते तसेच स्टार्सचा आवडता रॅपर बनला आणि त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान बनवले.

हनी सिंहला बॉलिवूडमध्ये भरपूर यश मिळाले, पण कालांतराने प्रत्येक कलाकाराप्रमाणे बॉलिवूडमध्ये त्याचा दर्जा हळूहळू संपुष्टात येऊ लागला आणि याचे एक कारण म्हणजे त्याच्या भोवतालचे वादाचे वलय. हनी सिंह केवळ त्याच्या गाण्यांमुळेच चर्चेत राहिला नाही, तर त्याला त्याच्या गाण्यांच्या बोलांपासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक वादांना सामोरे जावे लागले.

मादक पदार्थांचे व्यसन

हनी सिंह बराच काळ संगीत उद्योगातून गायब होता, त्यामुळे त्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, तो त्याच्या मादक पदार्थांच्या व्यसनामुळे पुनर्वसनात आहे. हा फक्त एक अंदाज होता, पण गायक जसबीर जस्सी यांनी एक निवेदन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, ‘मी हनीला चंदीगडमधील एका पुनर्वसन केंद्रात भेटलो.’ काहींनी जसबीरच्या या वक्तव्याला केवळ प्रसिद्धी स्टंट म्हटले, तर काहींनी हनी सिंह पुनर्वसन केंद्रात असल्याची पुष्टी केली.

गाण्यांचे बोल वादात

त्याने त्याच्या गाण्यात दुहेरी अर्थ असलेले शब्द वापरल्याचा आरोप अनेक वेळा केला गेला आहे. ज्याप्रकारे तो आपल्या गाण्यात स्त्रियांना एक वस्तू म्हणून चित्रित करतो, अनेक स्वयंसेवी संस्थांनी त्याचा निषेध केला आणि लोकांनी त्याच्यावर खूप टीका देखील केली. पण त्याच्या एका गाण्याबद्दल सर्वात मोठा वाद झाला. लोकांनी त्याच्यावर अश्लील गाणी बनवल्याचा आरोप केला. हे त्याचे आणि बादशाहचे गाणे होते. तथापि, त्याने हा आपला आवाज असल्याचे सरळ नाकारले. पण त्याच्या मुद्द्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले.

बादशाह आणि हनी सिंह यांच्यातील वाद

हनीने बादशहाला ‘नॅनो’ कार म्हटले होते. यामुळे या दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यांनी मिळून ‘खोल बॉटल’, ‘चार शनिवार’ आणि ‘गेट अप जवानी’ अशी अनेक सुपरहिट गाणी केली. पण काही काळानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले. पुढे त्यांची ही शब्दिक लढाई लवकरच हाणामारीत बदलली. दिल्लीत आयोजित एका पार्टीत हे दोघे भिडले होते. हनी सिंह तेव्हा बराच काळानंतर पडद्यावर दिसला होता. जेव्हा तो त्याच्या ‘झोरावर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टेजवर आलात, तेव्हा त्याला विचारले की, बादशाहने चित्रपटसृष्टीत तुझी जागा घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हनी सिंह म्हणाला की, रोल्स रॉयस आणि नॅनो कारची तुलना होत नाही.

हनी सिंह आणि रफ्तार वाद

एक काळ होता जेव्हा हनी सिंह आणि रफ्तार दोघेही खूप चांगले मित्र होते, परंतु त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला जेव्हा हनी सिंगने ‘माफिया मुंदिर’ या सुपरहिट गाण्याचे श्रेय रफ्तार आणि त्या गाण्यात काम करणाऱ्या इतर लोकांना दिले नाही आणि या गाण्यातून संपूर्ण प्रसिद्धी त्याने मिळवली.

कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

20 वर्षांच्या मैत्रीनंतर शालिनी तलवारशी गाठ बांधलेल्या हनी सिंहवर नुकतीच पत्नी शालिनी तलवारने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने हनीला आणि त्याच्या कुटुंबाला कोर्टात खेचले. त्याची याचिका दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

हेही वाचा :

Shama Sikandar : बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे शमा सिकंदर, पाहा फोटो

‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI