Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी शालिनी हिने हनी सिंहच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे.

Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार
हनी सिंह

मुंबई : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी शालिनी हिने हनी सिंहच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. शालिनीने पती हनी सिंहच्या विरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005’ अंतर्गत याचिका दाखल केली आहे.

तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांच्यासमोर आज म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शालिनीने गुन्हा दाखल केल्यानंतर महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांनी गायक आणि अभिनेता हनी सिंहला नोटीस जारी केली आहे. हनी सिंहला नोटीस जारी करून, त्याचे उत्तर देण्यास सांगितले आहे.

हनी सिंहला बजावली नोटीस

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारच्या वतीने वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप हजर झाले होते. त्यांनी आपल्या अशीलाने कोर्टात दाखल केलेली तक्रार दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केली, त्यानंतर न्यायालयाने हनी सिंहला नोटीस बजावली आणि 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. या व्यतिरिक्त, न्यायालयाने हनी सिंहच्या पत्नीच्या बाजूने एक अंतरिम आदेशही दिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण असल्याने हनी सिंह स्वतःच्या आणि पत्नीच्या संयुक्त मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

यो यो हनी सिंगचे खरे नाव हर्देश सिंह आहे. मुळचा पंजाबचा हर्देश ‘कॉकटेल’ चित्रपटानंतर यो यो हनी सिंह या नावाने खूप प्रसिद्ध झाला. त्याने चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘अंग्रेजी बीट’ या गाण्याला आपला आवाज दिला. हे गाणे प्रचंड हिट झाले होते. 2011 मध्ये, हे गाणे सर्वात प्रसिद्ध गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होते.

2014मध्ये, रियॅलिटी शो ‘इंडियाज रॉकस्टार’च्या माध्यमातून पहिल्यांदा हनी सिंहने आपली पत्नी शालिनी हिची सर्वांशी ओळख करून दिली होती. या दरम्यान, हनी सिंहची पत्नी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, कारण बऱ्याच लोकांना हनी सिंग विवाहित आहे, हे माहितही नव्हते.

(Yo Yo Honey Singh’s wife filed a complaint of domestic violence against him)

हेही वाचा :

वयाच्या 56व्या वर्षीही आमिर खानचं जबरदस्त वर्कआऊट सेशन, पाहा लेक आयराची भन्नाट प्रतिक्रिया…

…आणि अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले! प्रसंगावधानामुळे टळली ‘जयंती’च्या सेटवरची दुर्घटना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI