AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले! प्रसंगावधानामुळे टळली ‘जयंती’च्या सेटवरची दुर्घटना

अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) आपल्या उत्तम अभिनय आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली.

...आणि अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले! प्रसंगावधानामुळे टळली ‘जयंती’च्या सेटवरची दुर्घटना
मिलिंद शिंदे
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 1:54 PM
Share

मुंबई : कोरोनारुपी संकटाने जगभरात थैमान घातलं आणि सर्व व्यवसाय-उद्योग ठप्प झाले. इतर कार्यक्षेत्रांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीची परिस्थितीदेखील खालावली होती, सिनेमांचं चित्रीकरण तसेच प्रदर्शनाला टाळं लागलं होतं. परंतु, कालांतराने परिस्थिती विरळ होत गेल्यामुळे सर्व निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आणि परत एकदा सिनेमा, मालिका तसेच वेगवेगळ्या चित्रीकरणाची कामं सुरु झाली.

नवीन तसेच ज्या चित्रपटांच्या चित्रीकरणाची कामं लॉकडाऊनमुळे अर्धवट थांबली होती, अनलॉकनंतर काही प्रमाणात ती कामे चालू झाली. या काळात एका आगामी मराठी चित्रपटाच्या उर्वरीत भागाच्या चित्रीकरणाचे काम चालू झाले, ज्यात आजवर अनेक नावाजलेल्या खलनायकी भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे हे महत्वाची भूमिका साकारत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे (Milind Shinde) आपल्या उत्तम अभिनय आणि हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली.

नेमकं काय घडलं?

मोठ्या प्रतीक्षेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहित होते. चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अश्या अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते. नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते, ते आपल्या तयारीमध्ये इतके गुंतले होते की, आजूबाजूला कोणत्या गोष्टी चालू आहेत याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉटच्या चित्रीकरणाचा सराव करत होती.

कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती. या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती, नेमके तिथेचं उभे होते, हे समजलं नाही.

आणि अनर्थ टळला!

परंतु, जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.

… तर संकटाची सावली आपल्यावर पडत नाही!

या प्रसंगाबद्दल अभिनेते मिलिंद शिंदे सांगतात, “एखादं चांगलं काम आपल्या हातून घडत असेल तर तेव्हा संकटाची सावलीदेखील आपल्यावर पडत नाही…! अगदी त्याचप्रमाणे मी जरी माझ्या भूमिकेच्या तयारीत रमून गेलो होतो, रात्रीच्या समयी माझ्या आजूबाजूला चालत असलेल्या गोष्टीदेखील मला त्या क्षणासाठी दिसल्या नाहीत, मग ती मोठी जिमी जीब का असेना…! मी त्यावेळी जर झुकलो नसतो तर त्या लोखंडी जिमी जीबच्या माराने कदाचित मला गंभीर दुखापत झाली असती, पण सेटवरच्या सकारात्मक ऊर्जेमुळे मला खरचटलंदेखील नाही. सेटवर लोकांनी वेळीचं दाखवलेल्या प्रसंगावधामुळे माझा जीव वाचला….! मी जरी माझ्या कामात रमलो असलो तरी सेट वरील प्रत्येकाने मला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत काम केलं याचं मला कौतुक वाटतं.”

चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अ‍ॅक्शन, ड्रामा, आणि नव्या धाटणीच्या विषयासह “जयंती” हा सिनेमा आपल्या हटके नावामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय ठरेला आहे. जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर तर या सिनेमाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. सेटवर घडलेल्या घटनेत सुदैवाने मिलिंद शिंदे यांना काही दुखापत झाली नाही. सेटवर काम करत असलेल्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे धोका थोडक्यात टळला नाहीतर सेटवर काहीतरी विपरीत नक्कीच घडलं असतं, असे चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले. “जयंती” हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येण्यास सज्ज होत आहे.

(Actor Milind Shinde survived briefly on Upcoming film Jayanti set)

हेही वाचा :

‘चि. सर्वज्ञ आणि कु. स्रग्वी’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी आनंदाचा ‘डबल धमाका’!

PHOTO | ‘हे आनंदाचे क्षण आयुष्यभर टिकून राहतील जर…’, सोशल मीडियावर दिसला राजेश्वरीचा चिलिंग मूड!

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.