‘चि. सर्वज्ञ आणि कु. स्रग्वी’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी आनंदाचा ‘डबल धमाका’!

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले आहे. संकर्षणच्या पत्नीने शलाका पांडेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

‘चि. सर्वज्ञ आणि कु. स्रग्वी’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी आनंदाचा ‘डबल धमाका’!
संकर्षण कऱ्हाडे

मुंबई : छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले आहे. संकर्षणच्या पत्नीने शलाका पांडेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. एक मुलगी आणि एक मुलगा असा आनंदाचा ‘डबल डोस’ अभिनेत्याला मिळाला आहे. ‘बाबा झालो!’ म्हणत ही आनंदाची बातमी शेअर करताना संकर्षण कऱ्हाडेने आपल्या दोन्ही बाळांची नावं देखील चाहत्यांना सांगितली आहेत.

‘चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे’ अशी गोड नावं ऐकून त्याच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे. अनेक चाहते आणि कलाकार मंडळींनी या पोस्टवर भरभरून कमेंट करत शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.

पाहा पोस्ट :

काय आहे ‘या’ नावांचा अर्थ?

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आपल्या बाळांची नावं जाहीर करताना त्यांच्या नावाचा अर्थ देखील सांगितला आहे. ‘सर्वज्ञ’ अर्थात सर्व जाणनारा, ज्ञानी असा आणि ‘स्रग्वी’ म्हणजे पवित्रं तुळस, असे या नावांचे अर्थ आहेत.

संकर्षणची कारकीर्द

आपल्या अभिनय प्रतिभेने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने अवघ्या परभणीचे मान गर्वाने उंच केली आहे. संकर्षण कऱ्हाडे हा केवळ अभिनेताच नाही तर, तो एक उत्तम लेखक आणि संवेदनशील कवी देखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो अभिनय करण्याबरोबरच त्यांच्यासाठी लेखन देखील केले आहे.  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संकर्षणने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 2008च्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमामधून संकर्षणने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘आभास हा’, ‘मला सासू हवी’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलंय. याचबरोबर त्याने अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे.

पायाला दुखापत होऊनही अभिनेता रंगमंचावर हजर होतो!

काही महिन्यांपूर्वी संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाचे 100 प्रयोग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्याने सोशल मीडियाद्वारे चाह्त्यांसोबत एक खास आठवण प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. अगदी वर्षभरापूर्वी घडून गेलेली एक घटना त्याने या खास निमित्ताने शेअर केली होती. संकर्षणनं शेअर केलेली ही आठवण होती ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची! ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसाच, दुखापतग्रस्त पाय घेऊन त्याने आपल्या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पूर्ण केला होता. एक वर्षापूर्वीची ही आठवण संकर्षणने 100च्या खास निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केली होती.

(Actor Sankarshan Karhade blessed with twins baby share good news on social media)

हेही वाचा :

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बदललं अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरचं नातं, अर्जुन म्हणाला- सुरुवातीला आम्ही…

‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI