Video | वयाच्या 56व्या वर्षीही आमिर खानचं जबरदस्त वर्कआऊट सेशन, पाहा लेक आयराची भन्नाट प्रतिक्रिया…

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) व्यावसायिक गोष्टी अतिशय परिपूर्णतेने करतो. म्हणूनच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे नावही देण्यात आले आहे.

Video | वयाच्या 56व्या वर्षीही आमिर खानचं जबरदस्त वर्कआऊट सेशन, पाहा लेक आयराची भन्नाट प्रतिक्रिया...
आमिर खान

मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) व्यावसायिक गोष्टी अतिशय परिपूर्णतेने करतो. म्हणूनच त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे नावही देण्यात आले आहे. आमिर खान चित्रपट उत्कृष्ट बनण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. बॉडी ट्रान्सफॉर्मेशनपासून ते चित्रपटातील प्रत्येक गोष्टीकडे तो बारीक लक्ष देतो. आमिर सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. याआधीही आमिरचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन अनेक चित्रपटांसाठी पाहिले गेले आहे.

आपल्या अभिनयामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे आमिर नेहमीच चर्चेचा भाग बनला आहे. मात्र आता आमिरचा एक व्हिडीओ चर्चेत आला असून, या व्हिडीओवर त्याची लेक आयरा खान हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमिरचा वर्कआऊट व्हिडीओ चर्चेत

आता आमिरचा एक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो जड डंबेल उचलताना दिसत आहे. हा व्हिडीओ आताचा नसून, ‘धूम 3’ चित्रपट तयारी दरम्यानचा आहे. या चित्रपटासाठी आमिरने त्याच्या शरीरावर बरेच काम केले होते. आता आमिरचा हा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिच्या नजरेतूनही ती सुटलेली नाही. यावर आयरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Poznic Training (@poznictraining)

लेक आयराने दिली अशी प्रतिक्रिया

पॉझनिक ट्रेनिंग नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेय की, ‘धूम 3 आणि पीकेसाठी आमिर खानचे वैयक्तिक प्रशिक्षक’. आयरा खान हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिने लिहिले की, ‘हा कोणता व्यायाम आहे?’

Ira

आयराची प्रतिक्रिया

खान कुटुंब चर्चेत

अभिनेता आमिर खान अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोघेही व्यावसायिकरित्या नेहमी जोडलेले असतील. त्याचबरोबर आमिरची मुलगी आयरा खान सध्या फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरला डेट करत आहे. अनेकदा ती नुपूरसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते.

(Aamir Khan’s old workout video goes viral on social median Ira khan also reacted on this video)

हेही वाचा :

‘जोधा अकबर’ फेम अभिनेता मोठ्या आर्थिक अडचणीत, आजारपणामुळे कापावा लागला पाय

‘बेल बॉटम’च्या ट्रेलर लाँचसाठी अक्षय कुमार सज्ज, दिल्लीत होणार रिलीज सोहळा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI