AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bell Bottom Trailer | ‘बेल बॉटम’च्या ट्रेलर लाँचसाठी अक्षय कुमार सज्ज, दिल्लीत होणार रिलीज सोहळा!

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bell Bottom Trailer | ‘बेल बॉटम’च्या ट्रेलर लाँचसाठी अक्षय कुमार सज्ज, दिल्लीत होणार रिलीज सोहळा!
बेल बॉटम
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 12:34 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, पण चित्रपटगृहे न सुरु झाल्याने त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता अक्षयने चित्रपटाची नवीन रिलीज डेट चाहत्यांना सांगितली आहे आणि आज (3 ऑगस्ट) त्याचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी 5 वाजता रिलीज होणार आहे. अक्षय त्याच्या संपूर्ण टीमसोबत दिल्लीत ट्रेलर लाँच करणार आहे. अक्षयच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे त्याच्या चित्रपटाचा ट्रेलरही धमाका करणार आहे.

अशी असणार अक्षयची भूमिका

ट्रेलर रिलीज होण्याच्या एक दिवस आधी अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्याच्या पात्राबद्दल माहिती दिली होती. त्याचे पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले होते की, ‘तीक्ष्ण स्मृती, राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू, गाणी शिकवतो, हिंदी, इंग्रजी, जर्मन बोलतो. उर्वरित ट्रेलरसह सांगेन. बेल बॉटमचा ट्रेलर उद्या संध्याकाळी रिलीज होईल.’

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

3D मध्ये रिलीज होणार चित्रपट!

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट खास असणार आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. जो तुमच्या सिनेमागृहातील चित्रपट पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलेल. अक्षयने चित्रपटाच्या रिलीज डेटसोबत ही घोषणा केली. त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षयने लिहिले की, ‘19 ऑगस्ट रोजी पूर्ण थरार अनुभवा. बेल बॉटम 3D मध्ये येत आहे.’

बेल बॉटममध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेत्री वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे आणि रणजित तिवारी दिग्दर्शित आहेत.

IANS शी केलेल्या संभाषणात वाणी कपूरने अक्षय कुमारसोबत काम करण्याविषयी सांगितले होते. ती म्हणाली की, ‘मी भाग्यवान आहे की मला हिंदी चित्रपटसृष्टीतील आयकॉन अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. बेल बॉटम मधील माझी भूमिका छोटी पण खूप प्रभावी आहे.’

‘बेल बॉटम’चे शूटिंग गेल्या वर्षी कोरोना काळात करण्यात आले होते. संपूर्ण टीमने परदेशात जाऊन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. टीमने सोशल मीडियावर याबाबत माहितीही दिली होती.

(Bell Bottom Trailer Akshay Kumar ready for trailer launch, release ceremony to be held in Delhi)

हेही वाचा :

करिअरला उरती कळा लागल्यावर पत्नीने घर सावरलं, मनीष पॉलने दमदार पदार्पण करत पुन्हा यश मिळवलं!

Money Heist : मनी हाईस्टची ‘टोकियो’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड, पाहा फोटो

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.