Happy Birthday Maniesh Paul | करिअरला उतरती कळा लागल्यावर पत्नीने घर सावरलं, मनीष पॉलने दमदार पदार्पण करत पुन्हा यश मिळवलं!

मनीष पॉलने नेहमीच त्याच्या मजेशीर विनोद आणि कॉमिक टायमिंगने लोकांना खूप हसवले आहे. पण, फार कमी लोकांना माहीत आहे की, मनीष पॉलच्या या हसण्यामागे त्याच्या अनेक वेदना देखील दडलेल्या आहेत, ज्याचा सामना त्याने एका काळी केला होता.

Happy Birthday Maniesh Paul | करिअरला उतरती कळा लागल्यावर पत्नीने घर सावरलं, मनीष पॉलने दमदार पदार्पण करत पुन्हा यश मिळवलं!
मनीष पॉल
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 5:29 PM

मुंबई : अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) याला टीव्हीवर पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. जेव्हाही मनीष पॉल पडद्यावर दिसतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य असते, ज्यामुळे पाहणाऱ्याला नक्कीच गुदगुल्या होतात. मनीष पॉलने नेहमीच त्याच्या मजेशीर विनोद आणि कॉमिक टायमिंगने लोकांना खूप हसवले आहे. पण, फार कमी लोकांना माहीत आहे की, मनीष पॉलच्या या हसण्यामागे त्याच्या अनेक वेदना देखील दडलेल्या आहेत, ज्याचा सामना त्याने एका काळी केला होता.

आज (3 ऑगस्ट) मनीष पॉल यांचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलणार आहोत.  मनीषच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याच्याकडे घराचे भाडे देण्यासाठी पैसेही नव्हते. मग, त्याने सर्व गोष्टी अतिशय विचारपूर्वक व्यवस्थापित केल्या आणि त्याच्या एका विशेष व्यक्तीने त्याला त्याच्या संघर्षाच्या दिवसात खूप मदत केली. मनीष पॉल आज जे काही आहे, त्याचे श्रेय तो पत्नी संयुक्ताला देतो. ज्या खास व्यक्तीने मनीषला त्याच्या संघर्षमय दिवसांमध्ये पाठिंबा दिला, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नी संयुक्ता होती.

जेव्हा मनीष बेरोजगार झाला, तेव्हा पत्नी संयुक्ताने जबाबदारी स्वीकारली!

काही काळापूर्वी मनीषने त्याच्या संघर्षमयी दिवसांच्या आठवणी शेअर केल्या होत्या. 2008मध्ये आपल्याकडे कोणतेही काम नसल्याचा खुलासा मनीषने केला होता. त्यावेळी संयुक्‍ताने त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावत काम केले आणि तिने पूर्ण जबाबदारी घेतली. बॉम्बे ऑफ ह्युमन्सला दिलेल्या मुलाखतीत मनीष म्हणाला होता की, ‘2008 मध्ये मी एक वर्ष बेरोजगार होतो. माझ्याकडे घराचे भाडे देण्यासाठी पैसेही नव्हते, पण संयुक्ताने सर्वकाही सांभाळले. ती म्हणायची, ‘धीर धरा, तुला लवकरच चांगली संधी मिळेल.’ आणि एक वर्षानंतर, खरंच ते घडले.’

View this post on Instagram

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

…आणि गोष्टी पूर्ववत होऊ लागल्या!

मनीष पुढे सांगतो, ‘त्यानंतर मला एक टीव्ही मालिका मिळाली. गोष्टी पूर्ववत होऊ लागल्या. मी रिअॅलिटी शो आणि पुरस्कार सोहळे यांचे सूत्रसंचालन केले. आम्हाला 2011 मध्ये मुलगी आणि 2016 मध्ये मुलगा झाला. आता मी एका अशा ठिकाणी आहे, जिथे मी आणि संयुक्ता आमच्या मुलांसाठी वेळ काढू शकतो आणि जेवणाच्या टेबलवर कोणीही कामाबद्दल बोलायचं नाही, असा आमचा नियम आहे. 2007 मध्ये मनीषने संयुक्ताशी लग्न केले. संयुक्ता मनीषची बालपणीची मैत्रीण होती. तिने मनीषला जितके समजून घेतले, तितके त्याला क्वचितच कोणी समजून घेतले असेल. मनीषने स्वतः ही गोष्ट सांगितली होती.

(Happy Birthday Maniesh Paul actor made a strong debut and achieved success again)

हेही वाचा :

स्ट्रगलर ते ‘गुत्थी’ बनण्यापर्यंतचा संघर्षमयी प्रवास, वाचा अभिनेता सुनील ग्रोव्हरबद्दल…

प्रोफेसर अखेर इन्स्पेक्टर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अखेर चोरीचं सत्र संपणार का? पाहा ‘मनी हाईस्ट 5’चा जबरदस्त ट्रेलर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.