Throwback | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? कारकीर्दीच्या पहिल्या फोटोशूटमधील फोटो पाहून चाहतेही अवाक्!

अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) याने अभिनेता होण्याची तयारी करत असतानाचा, अर्थात त्याच्या सुरुवातीच्या फोटोशूटमधील एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मनीष पॉल याने लिहिले की, ‘मला अजूनही आठवत आहे, डोळ्यांसमोर स्वप्ने ठेवून…

Throwback | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? कारकीर्दीच्या पहिल्या फोटोशूटमधील फोटो पाहून चाहतेही अवाक्!
मनीष पॉल


मुंबई : अभिनेता मनीष पॉल (Maniesh Paul) याने अभिनेता होण्याची तयारी करत असतानाचा, अर्थात त्याच्या सुरुवातीच्या फोटोशूटमधील एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना मनीष पॉल याने लिहिले की, ‘मला अजूनही आठवत आहे, डोळ्यांसमोर स्वप्ने ठेवून… मालवीय नगर दिल्लीतील फोटो लॅबमध्ये गेलो… त्याने माझे पिंपल्स लपवण्यासाठी माझ्या चेहऱ्यावर मेकअप देखील लावला होता.’(Actor Maniesh Paul share throwback photo from his first photoshoot)

तो म्हणाला की, भाई तू एका हिरोसारखा दिसत आहेस… आणि माझा विश्वास बसला… खरंच मला या मुलाचे कौतुक करावे लागेल. तसा, आईने एक काळा धागा देखील बांधला ज्यामुळे तिच्या हिरो मुलाला कुणाची नजर लागू नये.’

पाहा मनीषची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

मनीष पॉल यांनी काही काळापूर्वी फिल्मफेअर अवॉर्ड्सचे होस्टिंग केले होते. त्यात मनीषने कलाकारांसोबत बरीच धमाल मस्ती केली. मनीषची स्टेजवर शो होस्ट करण्याची स्वतःची वेगळीच स्टाईल आहे. तो अनेकदा गमतीशीरपणे सह-अभिनेत्रींसह फ्लर्टिंग करताना दिसतो. जी प्रेक्षकांनासुद्धा आवडते आणि कलाकारानांही त्याच्या बोलण्याची काहीच हरकत नाही.

पाहा मनीषची हटके स्टाईल

मालवीय नगर दिल्ली येथील रहिवासी असणाऱ्या मनीष पॉल याने इंडस्ट्रीत विविध माध्यमाद्वारे प्रवास सुरू केला आणि शेवटी तो या क्षेत्रात यशस्वी झाला. आरजे आणि नंतर व्हीजे म्हणून नाव कमावत मनीष पॉल याने स्वत:ला अभिनेता, यजमान तसेच गायक म्हणून सादर केले आणि प्रत्येक व्यासपीठावर आपली ओळख निर्माण केली.

पॉडकास्टच्या विश्वात पदार्पण

‘स्टेज का सुलतान’ म्हणून ओळखला जाणारा मनीष पॉल याने अलीकडेच, आपल्या संप्रेषण कौशल्याचा उपयोग करून, विविध क्षेत्रातील लोकांच्या कथा सादर करण्यासाठी ‘द मनीश पॉल पॉडकास्ट’ सुरू केले आहे. यात मनीष देशातील बड्या डॉक्टरांशी बोलून कोरोनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता मोहीम राबवत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मनीष याने दोन भावनिक कविता देखील लिहिल्या होत्या. मनीष पॉल सध्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘जुग जुग जिओ’च्या पुढील शूटसाठी तयार आहे. चाहते देखील त्याच्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

(Actor Maniesh Paul share throwback photo from his first photoshoot)

हेही वाचा :

राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

Birthday Special | सलमान खानची बहिण अलविराच्या प्रेमात पडले अतुल अग्निहोत्री, अशी मिळाली होती लग्नाची परवानगी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI