राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

एका मुलाखतीत अभिनेत्रीला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल, असे विचारले गेले होते. यावर उत्तर देताना तिने म्हटले की, राजकुमार राव. म्हणजेच बहु-प्रतिभावंत अभिनेता राजकुमार राव याने अभिनेत्रीला पूर्णपणे प्रभावित केले आहे.

राज कुमार रावसोबत काम करू इच्छिते समांथा अक्किनेनी, पाहा काय म्हणाली अभिनेत्री...
समांथा-राजकुमार राव

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासह ‘फॅमिली मॅन 2’मध्ये चाहत्यांनी नुकतेच अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) यांचा दमदार अभिनय पाहिला आहे. समांथा ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. सीरीजमध्ये अभिनेत्रीने केलेल्या बिनधास्त अभिनयाने तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्य वाटले आहे. समांथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात हक्काची जागा तयार केली आहे (Samantha Akkineni wants to work with bollywood actor Rajkumar Rao).

तसे, समांथाने आतापर्यंत प्रामुख्याने तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा परिस्थितीत या सीरीजला अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा मुख्य केंद्र म्हटले जाऊ शकते. समांथा अक्किनेनीशी यापूर्वीच बॉलिवूडमधील चित्रपटांसाठी संपर्क साधला गेला होता. याशिवाय तिला हिंदी चित्रपटसृष्टीचे वातावरण आधीपासूनच खूप आवडते. तिला अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत काम करायचे आहेत, ज्यात राजकुमार रावचा (Rajkumar Rao) देखील आहेत. दुसरीकडे समांथाने शाहिद कपूरसोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

राज कुमार बरोबर काम करण्याविषयी समांथा म्हणते…

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत अभिनेत्रीला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल, असे विचारले गेले होते. यावर उत्तर देताना तिने म्हटले की, राजकुमार राव. म्हणजेच बहु-प्रतिभावंत अभिनेता राजकुमार राव याने अभिनेत्रीला पूर्णपणे प्रभावित केले आहे.

इतकेच नाही तर जेव्हा या अभिनेत्रीला विचारले गेले की, तिला ‘स्त्री’ फेम राजकुमार राव यांच्याबरोबर काम करायला आवडेल का? तर अभिनेत्रीने असं म्हटलं की, अर्थातच एखादी चांगली कथा माझ्यासमोर आली, तर ती नक्कीच काम करेल. अशा परिस्थितीत समांथा राजकुमारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर तिला संधी मिळाली, तर आणखी ती एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याबरोबर एखाद्या चित्रपटात नक्कीच काम करेल. त्याचबरोबर जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हापासून राजकुमारच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

समांथा आणि राजकुमार दोघेही उत्तम कलाकार आहेत. दोघांची जादू चाहत्यांच्या मनावर पसरली आहे. समांथाने ‘मजिली’, ‘जानू’ सारख्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री समांथाने जेव्हा 2017मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले, तेव्हा ती खूप चर्चेत आली होती.

राजकुमार राव याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकताच तो ‘रुही’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात जान्हवी कपूर त्याच्यासोबत झळकली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपटानेही खूप चांगली कामगिरी केली होती.

(Samantha Akkineni wants to work with bollywood actor Rajkumar Rao)

हेही वाचा :

Birthday Special | सलमान खानची बहिण अलविराच्या प्रेमात पडले अतुल अग्निहोत्री, अशी मिळाली होती लग्नाची परवानगी!

Photo : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा, पाहा सुंदर फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI