Birthday Special | सलमान खानची बहिण अलविराच्या प्रेमात पडले अतुल अग्निहोत्री, अशी मिळाली होती लग्नाची परवानगी!

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) आपल्या फॅमिलीबद्दल खूप प्रोटेक्टीव्ह आहे. ज्यामुळे त्याला नेहमीच आपल्या कुटुंबासोबत रहायला आवडते. आज (24 जून) त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्री (Atul Agnihotri) यांचा वाढदिवस आहे.

Birthday Special | सलमान खानची बहिण अलविराच्या प्रेमात पडले अतुल अग्निहोत्री, अशी मिळाली होती लग्नाची परवानगी!
अतुल-अलविरा-सलमान

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) आपल्या फॅमिलीबद्दल खूप प्रोटेक्टीव्ह आहे. ज्यामुळे त्याला नेहमीच आपल्या कुटुंबासोबत रहायला आवडते. आज (24 जून) त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्री (Atul Agnihotri) यांचा वाढदिवस आहे. अतुल अग्निहोत्रीने सलमान खानची बहीण अलविरा (Alvira khan) खानशी लग्न केले आहे. अलविरा आणि अतुल यांची पहिली भेट ‘जागृती’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटामध्ये अलविरा सहाय्यक दिग्दर्शक होती (Happy Birthday Atul Agnihotri know about his love story with salman khan sister alvira).

त्याचवेळी अतुल अग्निहोत्री यांनी 1993 मध्ये ‘सर’ या चित्रपटाद्वारे अभिनयातही पदार्पण केले होते. मात्र, अलविरा आणि अतुल यांची पहिली भेट ‘जागृती’ चित्रपटाच्याच सेटवर झाली. तसे, दोघांनाही बर्‍याच अ‍ॅड शूटवर एकमेकांकडे पाहिले होते. पण, विशेष भेट अशी कधीच झाली नव्हती. पण, या चित्रपटाच्या सेटवर या दोघांनाही एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी खूप वेळ मिळाला होता, ज्यामुळे त्यांची मैत्री इथे प्रेमात रूपांतरीत झाली होती. या दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केले आणि नंतर दोघांच्याही घरी त्यांच्या नात्याबद्दल कुणकुण लागली.

सलमानची प्रतिक्रिया

सुरुवातीला अलविराला असे वाटले होते की, जेव्हा सलमान खानला या सर्व गोष्टी कळतील, तेव्हा तो खूप रागावेल. परंतु, ही बातमी समजल्यानंतर त्याने तसे काहीही केले नाही आणि दोघांच्या लग्नास तो लगेचच राजी झाले. हे ऐकून सर्वांना खूप आश्चर्य वाटले. अतुल कित्येक दिवस या विचाराने घाबरला होता की, सलमानने लग्न करण्यास नकार दिल्यास आपण काय करावे? पण, तसे काहीच झाले नाही. सलमान खाननंतर अलविराचे वडील सलीम खान यांनी अद्याप हे नाते स्वीकारले नव्हते. त्यांची परवानगी घेणे हे संपूर्ण खान कुटुंबांसाठी महत्त्वाचे होते.

सलीम खान काय म्हणाले?

एका खास मुलाखतीत अतुलने सांगितले होते की, एक दिवस अलविराने अचानक त्याला तिच्या घरी नेले, जिथे सलीमजी बसून वर्तमानपत्र वाचत होते. यादरम्यान, अलविरा त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाली की, “पापा, मला आवडतो तो हाच मुलगा आहे” त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि सांगितले की, “मलाही तो आवडतो.” त्यानंतर 1996 साली दोघांचे लग्न झाले. लग्नाआधी या जोडप्याने एकमेकांना 2 वर्षे डेट केले आणि मग लग्न केले. अतुल सद्य घडीला सलमान खानच्या अगदी जवळचा व्यक्ती आहे. इतकेच नाही तर, त्याच्या ‘बॉडीगार्ड’ आणि ‘भारत’ सलमान खानच्या अशा अनेक चित्रपटांचा दिग्दर्शक आणि निर्माताही आहे.

(Happy Birthday Atul Agnihotri know about his love story with salman khan sister alvira)

हेही वाचा :

Photo : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा, पाहा सुंदर फोटो

‘जयललिता’नंतर आता ‘इंदिरा गांधी’ बनणार कंगना रनौत, चित्रपटाच्या तयारीसाठी मुंबईत दाखल!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI