AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणिताचे उत्तर चुकले म्हणून मॉनिटर संतापला, नंतर पुढे जे घडलं ते…, शाळेत नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील हिवरे कुंभार जिल्हा परिषद शाळेत गणिताचे उदाहरण चुकल्याने ७ वीच्या १५ विद्यार्थ्यांना मॉनिटरने अमानुषपणे मारहाण केली. शिक्षकांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे.

गणिताचे उत्तर चुकले म्हणून मॉनिटर संतापला, नंतर पुढे जे घडलं ते..., शाळेत नेमकं काय घडलं?
pune
| Updated on: Mar 10, 2026 | 8:25 AM
Share

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ गणिताच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याच्या क्षुल्लक कारणावरून इयत्ता सातवीतील तब्बल १५ विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मारहाण वर्गातील मॉनिटरने थेट शिक्षकांच्या देखरेखीखाली केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गाचा गणिताचा तास सुरू होता. यावेळी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणिताची काही उदाहरणे सोडवण्यास दिली होती. ज्या विद्यार्थ्यांची उत्तरे चुकली, त्यांना शिक्षा म्हणून वर्गातील मॉनिटरने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठले असून काही विद्यार्थ्यांना जबर दुखापत झाली आहे.

शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शाळेत शिस्त लावण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे शारीरिक अत्याचार करणे कायद्याने गुन्हा आहे. या घटनेत शिक्षकांनी स्वतः मारहाण न करता वर्ग मॉनिटरला मारहाण करायला लावली. हे सर्व त्यांच्या समोरच घडल्याने शाळा प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले जात आहेत. गुरुजींनीच त्याला मारायला सांगितले असा दावा घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

ही शाळा सुटल्यानंतर मुले घरी गेल्यावर हा प्रकार उघड झाला. विद्यार्थ्यांच्या अंगावरील खुणा पाहून पालकांनी तातडीने शाळेत धाव घेतली. मात्र, शाळा प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित शिक्षक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई

या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. आरटीई (RTE) कायद्यानुसार शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करवून घेणे हा प्रकार गंभीर मानला जात आहे. शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून तिथे मुलांना अशा प्रकारे दहशतीखाली ठेवणे निषेधार्ह आहे. या प्रकरणातील दोषी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ