‘जयललिता’नंतर आता ‘इंदिरा गांधी’ बनणार कंगना रनौत, चित्रपटाच्या तयारीसाठी मुंबईत दाखल!

बॉलिवूडची धडाकेबाज अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या दमदार अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीच्या चित्रपटांची निवड देखील चांगली मानली जाते. आता कंगनाकडे तिच्यासोबत प्रोजेक्ट्समध्ये बरेच दमदार चित्रपट रांगा लावून आहेत.

‘जयललिता’नंतर आता ‘इंदिरा गांधी’ बनणार कंगना रनौत, चित्रपटाच्या तयारीसाठी मुंबईत दाखल!
कंगना रनौत

मुंबई : बॉलिवूडची धडाकेबाज अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या दमदार अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीच्या चित्रपटांची निवड देखील चांगली मानली जाते. आता कंगनाकडे तिच्यासोबत प्रोजेक्ट्समध्ये बरेच दमदार चित्रपट रांगा लावून आहेत. तर, आता असे वृत्त समोर आले आहे की, कंगना रनौत लवकरच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कंगनाला ही भूमिका साकारायची होती (Kangana Ranaut will play Former Prime Minister Indira Gandhi).

इतकेच नाही तर तिचे चाहतेही मागील कित्येक वर्षांपासून तिच्या या प्रोजेक्टबद्दल बरीच चर्चा करत होते. आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची एक छोटीशी झलकही दाखवली आहे.

पाहा कंगनाची स्टोरी

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काल काही स्टोरी पोस्ट केल्या होत्या. ज्या आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. कंगनाने या स्टोरीत सांगितले आहे की, ती आता तिच्या नवीन चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. त्यांनी लिहिले की “विचार करा आता मणिकर्णिका फिल्म्समध्ये काय चालले आहे?” दुसर्‍या फोटोत तिने सांगितले आहे की, ती इंदिरा गांधींच्या लूकसाठी तिचे शरीर स्कॅन करत आहे.

अलीकडेच या चित्रपटाविषयी बोलताना कंगनाने सांगितले की, ती लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा चित्रपट त्यांचा बायोपिक असणार नाहीय, हा एक ग्रँड पीरियड ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये राजकारणाबद्दल बराच ड्रामा असेल. याविषयी बोलताना अभिनेत्रीने सांगितले होते की, हा चित्रपट पाहणे माझ्या पिढीला सध्याची भारताची सामाजिक-राजकीय परिस्थिती समजण्यास सुलभ करेल. अभिनेत्रीचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

कोरोनाची लागण

मे महिन्यात कंगना कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. तिने स्वत:ला घरातच अलग केले होते. कोरोनाविषयी बोलताना कंगनाने म्हटले होते की, हा फक्त एक सामान्य फ्लू आहे आणि मी त्याचा नक्कीच अंत करेन. मात्र, या विधानामुळे कंगना बरीच ट्रोल झाली होती.

मग, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, माझा रिपोर्ट नकारात्मक आला आहे आणि कोरोनाविरोधात मी कसा लढा दिला हे मी तुम्हाला सांगू इच्छिते, परंतु मला असे सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या चाहत्यांना राग येईल. होय, असे बरेच लोक आहेत ज्यांना कोरोना विरुद्ध बोलताना वाईट वाटते.

ट्विटर अकाऊंट निलंबित

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. आता आपले विचार शेअर करण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये (Israel Palestine issue) कंगनाने सोशल मीडियावर इस्रायलचे समर्थन होते.

(Kangana Ranaut will play Former Prime Minister Indira Gandhi)

हेही वाचा :

Khatron Ke Khiladi 11 : बोलण्याच्या ओघात राखी सावंतकडून मोठी चूक, ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचे नाव केले जाहीर!

Krrish 4 | ‘क्रिश’ला 15 वर्ष पूर्ण, हृतिक रोशनची चाहत्यांना मोठी भेट, पाहा ‘क्रिश 4’ची झलक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI