Money Heist 5 Trailer | प्रोफेसर अखेर इन्स्पेक्टर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अखेर चोरीचं सत्र संपणार का? पाहा ‘मनी हाईस्ट 5’चा जबरदस्त ट्रेलर

नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात अधिक लोकप्रिय ठरलेली वेबसीरीज ‘मनी हाईस्ट’च्या 5 व्या सीझनची (Money Heist 5 Trailer) चाहते खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एक स्पॅनिश शो असूनही,  ही वेब सीरीज जगभर पसंत केली गेली आहे.

Money Heist 5 Trailer | प्रोफेसर अखेर इन्स्पेक्टर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अखेर चोरीचं सत्र संपणार का? पाहा ‘मनी हाईस्ट 5’चा जबरदस्त ट्रेलर
मनी हाईस्ट 5

मुंबई : नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात अधिक लोकप्रिय ठरलेली वेबसीरीज ‘मनी हाईस्ट’च्या 5 व्या सीझनची (Money Heist 5 Trailer) चाहते खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एक स्पॅनिश शो असूनही,  ही वेब सीरीज जगभर पसंत केली गेली आहे आणि आता या सीरीजच्या पाचव्या सीझनचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

या ट्रेलरच्या सुरुवातीलाच टोकियोला साखळीने बांधून दिसते आणि नंतर एक सीन येतो जेव्हा इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएरा प्रोफेसरला पकडतात आणि त्याला साखळीने बांधतात. दुसरीकडे, प्रोफेसर पकडला गेल्यावर रॅकेल या टीमचे नेतृत्व करते आणि हे मिशन पुढे नेते. ट्रेलर प्रचंड थरारक आणि सस्पेन्सने भरलेला आहे. पोलीस आणि प्रोफेसरच्या टीममध्ये जबरदस्त युद्ध होताना दिसते. ट्रेलरच्या शेवटी असे लिहिले आहे की, ‘नेहमी लढा आणि कधीही आत्मसमर्पण करू नका!’

या सीरीजचा 5 वा सीझन खूप महत्वाचा आहे, कारण तो शेवटचा भाग असेल आणि प्रोफेसर हा शेवटचा डाव जिंकतील की हरतील हे त्यातून कळणार आहे. ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, हा सीझन खूप मजेदार असणार आहे. ट्रेलर रीलीज होताच चाहते सीरीज पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक झाले आहेत.

पाहा ट्रेलर

यापूर्वी या सीरीजचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यात प्राध्यापक साखळीने बांधलेला दिसला होता आणि त्याला इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएराने पकडले होते. हे पाहून, चाहत्यांना जाणून घ्यायचे होते की नेहमी प्रत्येकाला चकवणारा प्राध्यापक शेवटच्या भागात सिएराच्या हाती नेमका कसा लागतो?

5 व्या सीझनचे 2 भाग

या सीरीजचा पाचवा सीझन 2 भागांमध्ये विभागला जाईल. पहिला भाग 3 सप्टेंबरला, तर दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज होईल.

कशी हिट झाली सीरीज?

Abserver.com च्या अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे या सीरीजला खूप फायदा झाला आहे. खरं तर, लॉकडाऊन दरम्यान ‘मनी हाईस्ट’चा तिसरा आणि चौथा सीझन रिलीज झाला होता आणि त्यावेळी प्रत्येकजण ओटीटीवर सीरीज पाहण्यात अधिक व्यस्त होता, कारण थिएटर बंद होते. प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली आणि प्रत्येकाला ती खूप आवडली. कोरोना काळादरम्यान सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरीजमध्ये ‘मनी हाईस्ट’चा देखील समावेश आहे.

(Money Heist 5 Trailer The professor is finally in the custody of Inspector Alicia)

हेही वाचा :

Money Heist | तब्बल 5 वेळा ऑडिशन दिल्यानंतर अल्वारो मोर्टेला मिळाले ‘मनी हाईस्ट’मध्ये काम, खऱ्या आयुष्यातही शिक्षक म्हणूनही केलेय काम!

Money Heist Season 5 Trailer | ‘प्रोफेसर’ला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक, काही वेळातच रिलीज होणार बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा ट्रेलर!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI