Money Heist Season 5 Trailer | ‘प्रोफेसर’ला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक, काही वेळातच रिलीज होणार बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा ट्रेलर!

नेटफ्लिक्सच्या सर्वात लोकप्रिय आणि ट्रेंडिंग वेब सीरीज 'मनी हाईस्ट'च्या (Money Heist) पाचव्या सीझनचा ट्रेलर आज (2 ऑगस्ट) रिलीज होणार आहे. सीझन 5 ‘मनी हाईस्ट’चा शेवटचा सीझन (Money Heist Season 5 ) असणार आहे.

Money Heist Season 5 Trailer | ‘प्रोफेसर’ला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक, काही वेळातच रिलीज होणार बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा ट्रेलर!
मनी हाईस्ट

मुंबई : नेटफ्लिक्सच्या सर्वात लोकप्रिय आणि ट्रेंडिंग वेब सीरीज ‘मनी हाईस्ट’च्या (Money Heist) पाचव्या सीझनचा ट्रेलर आज (2 ऑगस्ट) रिलीज होणार आहे. सीझन 5 ‘मनी हाईस्ट’चा शेवटचा सीझन (Money Heist Season 5 ) असणार आहे. यामुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आज म्हणजे 2 ऑगस्ट रोजी या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज तारीख जाहीर झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लॉकडाऊनमध्ये जगभरात पाहिली जाणारी सर्वात आवडती सीरीज होण्याचा मान ‘मनी हाईस्ट’ला मिळाला आहे. चाहत्यांना या सीरीजचा प्रत्येक सीझन खूप आवडला आहे. या सीरीजचा जबरदस्त सस्पेन्सने सर्वांनाच वेड लावणारा आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने अलीकडेच या वेब सीरीजशी संबंधित एक छोटीशी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती. या क्लिपमध्ये अभिनेता अल्वारो मोर्टे उर्फ ​​प्रोफेसरला एका खुर्चीला बांधलेले दिसले होते. हे बघून हे स्पष्ट होते की, कोणाच्याही हाती न आलेला प्राध्यापक आता इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएराच्या तावडीत सापडला आहे. सीझन चारच्या शेवटच्या भागात आपण पाहिले की, इन्स्पेक्टर अॅलिसिया प्रोफेसरचा शोध घेत आहे, कारण ती आता प्राध्यापकाचा बदला घेण्याच्या मनःस्थितीत आहे. अॅलिसियाने नोकरी गमावल्यानंतर पोलीस खात्यामुळे सुरू झालेला या दोघांमधील लढा आता अगदी वैयक्तिक झाला आहे.

प्रेक्षक उत्सुक

हा व्हिडीओ रिलीज होताच, तो सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. जिथे चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला, तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले की प्रोफेसरला पोलिसांनी नेमके कसे पकडले? किंवा ही प्रोफेसरची काही नवीन युक्ती आहे का? पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना कोणते ने धक्के मिळणार आहेत, हे अद्याप उघड झाले नाही, ज्यामुळे चाहते आज या सीरीजच्या पुढील ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज ‘मनी हेस्ट’चा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रोफेसर आणि त्याच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांची कशी प्रतिक्रिया मिळते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

5व्या सीझनमध्ये मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

या वेब सीरीजमध्ये दिसणार्‍या सर्व पात्रांची नावे जगातील बड्या शहरांच्या नावावर ठेवली गेली होती. यामध्ये टोकियो, बर्लिन, मॉस्को, नैरोबी, रिओ, डेन्व्हर आणि हेलसिंकी या नावांचा समावेश आहे. या मालिकेत असे दिसून आले आहे, की प्राध्यापक अतिशय कठोर विचारशील होते आणि त्यांनी ‘रॉयल ​​मिंट ऑफ स्पेन’ आणि ‘बँक ऑफ स्पेन’ मध्ये त्याच्या टीमसह चोरी करून अतिशय मनोरंजक आणि शिताफीने बाहेर पडतात. तथापि, आता हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल की, प्रोफेसर आणि त्यांची टीम मनी हाईस्टच्या 5 व्या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी काय मेजवानी देते….

(Money Heist Season 5 Trailer releasing on 2 August 2021)

हेही वाचा :

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

Binge Watch : ‘चुट्ज़पाह’ ते शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ‘विकेंड’ मेजवानी!

Bigg Boss OTT | यावेळी शोमध्ये असा कंटेंट असणार जो टीव्हीवर होईल बॅन, ‘बिग बॉस ओटीटी’ची धमाकेदार घोषणा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI