Binge Watch : ‘चुट्ज़पाह’ ते शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ‘विकेंड’ मेजवानी!

कोरोनामुळे प्रेक्षक आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे अधिक वळले आहेत. गेल्या आठवड्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच तडका पाहायला मिळाला. आता या शनिवार व रविवारी देखील मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे.  

Binge Watch : 'चुट्ज़पाह' ते शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ‘विकेंड’ मेजवानी!
OTT Release


मुंबई : कोरोना संसर्गापूर्वी, प्रत्येकजण शुक्रवारची आतुरतेने प्रतीक्षा करत असे, जेणेकरुन त्यांना चित्रपटगृहांमध्ये नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट पाहण्याची संधी मिळावी. तथापि, कोरोनामुळे प्रेक्षक आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे अधिक वळले आहेत. गेल्या आठवड्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाच तडका पाहायला मिळाला. आता या शनिवार व रविवारी देखील मनोरंजनाची मोठी मेजवानी असणार आहे.  या आठवड्याच्या शेवटाला देखील अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक…

  1. 14 फेरे

विक्रांत मेस्सी आणि कृती खरबंदा यांचा ’14 फेरे’ हा चित्रपट शुक्रवारी (23 जुलै) प्रदर्शित झाला आहे. विक्रांत मेस्सीनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा एक विनोदी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये मनोरंजनाबरोबरच एक शिकवणदेखील आहे. देवंशु कुमार दिग्दर्शित हा चित्रपट तुम्ही ‘झी 5’ वर पाहू शकता.

  1. ‘चुट्ज़पाह’

‘चुट्ज़पाह’ ही एक अतिशय रंजक सीरीज आहे, ज्यात पाच वेगवेगळ्या कथा दर्शवल्या गेल्या आहेत. या कथा आपल्याला सोशल मीडिया लाईफ आणि इंटरनेट संस्कृतीशी परिचित करणार आहेत. ही सीरीज डिजिटल पिढीची काळी बाजू दाखवते. आजची तरुण पिढी इंटरनेटच्या तावडीत कशी अडकली आहे, ते दाखवते. सिमरप्रीत सिंग दिग्दर्शित या मालिकेत वरुण शर्मा, मनजोत सिंह, एलनाझ नोरोजी, गौतम मेहरा असे अनेक कलाकार दिसणार आहेत. आपण सोनी लिव्हवर ही मालिका पाहू शकता.

  1. हंगामा 2

प्रेक्षकांमध्ये पुन्हा एकदा हास्याची लाट निर्माण करण्यासाठी प्रियदर्शन सज्ज झाले आहे. दिग्दर्शकाच्या ‘हंगामा’ चित्रपटाचा सिक्वेल शुक्रवारी (23 जुलै) प्रदर्शित झाला आहे. या वेळी चित्रपटाची कास्ट मागील वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ‘हंगामा 2’मध्ये शिल्पा शेट्टी, परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष ओटीटी प्लॅटफॉर्मवर हंगामा करताना दिसतील. आपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट पाहू शकता.

  1. फील लाईक इश्क

या सीरीजमध्ये आपल्याला सहा भिन्नभिन्न कथा पाहायला मिळतील. या मालिकेत प्रेम, वेगळेपणा, हसू आणि पश्चात्ताप सगळंच आहे. आजचा तरुण स्वत:ला या सीरीज कथेशी जोडलेला वाटू शकतो. यात राधिका मदन, अमोल पराशर, रोहित सराफ, संगीता भट्टाचार्य असे अनेक कलाकार दिसणार आहेत. आपण नेटिफ्लिक्सवर ही सीरीज पाहू शकता.

  1. होस्टल डेज़ सीझन 2

‘हॉस्टेल डेज’चा पहिला सीझन प्रेक्षकांनी चांगलाच आवडला होता. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे आयुष्य खरोखर काय असते, ते या सीरीजमध्ये दाखवले गेले. पहिल्या सीझनमध्ये चार मित्रांची कहाणी दर्शवली गेली होती. त्याचबरोबर आता दुसर्‍या सत्रात त्यांचा सिनिअर झाल्यानंतरचा प्रवास दर्शवला जाईल. या सीरीजमध्ये आदर्श गौरव, एहसान चन्ना, आयुषी गुप्ता हे कलाकार दिसणार आहेत. आपण ही सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

(Binge Watch chutzpah to Hungama 2 here is the list of this week release movies and series)

हेही वाचा :

Captain India : कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा, ‘पायलट’ बनून जिंकणार प्रेक्षकांचं मन!

पुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!  

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI