AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!  

लोकप्रिय राजकीय ड्रामा ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City of Dreams 2 ) ही वेब सीरीज सीझन 2सह ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

पुन्हा एकदा रंगणार सत्तेचा डाव, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!  
सिटी ऑफ ड्रीम्स 2
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 21, 2021 | 4:18 PM
Share

मुंबई : लोकप्रिय राजकीय ड्रामा ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ (City of Dreams 2 ) ही वेब सीरीज सीझन 2सह ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री फ्लोरा सैनीने रात्री उशिरा याची पुष्टी केली की, ‘सिटी ऑफ ड्रीम्स सीझन 2’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर याचे पोस्टर शेअर करतांना फ्लोराने लिहिले की, ‘गायकवाडांमध्ये आणखी एका युद्धाला सुरुवात होईल’? कोण जिंकेल? बाप, मुलगी की राज्य?’ यासोबतच तिने हे देखील सांगितले की, यावेळी सीझन 2मध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाईल.

दुसरीकडे अभिनेत्री प्रिया बापटने देखील या वेबसीरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. वेब सीरीजच्या या सीझनमध्ये लेक आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. सत्तेच्या लालसेपुढे सर्व नाती छोटी असतात. एखादा राजकारणी याच लालसेपोटी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो आणि त्याची मुलगी देखील त्याला कशी जोरदार टक्कर देते, हे या सीरीजमध्ये दाखवलं जाणार आहे.

पाहा ट्रेलर :

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

काय असेल कथा?

‘सीरिज सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन 1च्या शेवटी, या राजकीय पार्टीची भव्य बैठक पहिली होती. जगदीश दिल्लीसाठी योजना आखतो आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतो. दरम्यान, पौर्णिमाला हल्ल्याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे सीझन 1मध्ये शिल्लक राहिलेली ही कहाणी सीझन 2 मध्येही सुरू राहील. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला.

या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली होती. आता दुसऱ्या सीझनचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्कंठा कमालीची वाढली आहे.

कोरोनामुळे शुटिंग स्थगित

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. रोहित बनवलीकर आणि नागेश कुकनूर यांनी सहलेखन केले होते. ही एक राजकीय ड्रामा सीरीज आहे, ज्याच्या आगामी भागाची प्रतीक्षा  प्रेक्षकांना गेल्या वर्षी डिसेंबरपासून होती. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शूटिंग थांबवण्यात आले होते. सीझन 1ला लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

(The second season of City of Dreams 2 is coming soon on Hotstar)

हेही वाचा :

Binge Watch : रोमँटिक-विनोदी चित्रपट पाहून कंटाळलायत? मग, ओटीटीवर या 5 फॅन्टसी सीरीज नक्की पाहा!

Samantar 2 | ‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...