Samantar 2 | ‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!

पहिल्या सीझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या (Samantar 2) दुसऱ्या सीझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत या सीरीजला 56 दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे.

Samantar 2 | ‘समांतर 2’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद, अवघ्या 15 दिवसांत 56 दशलक्षहूनही अधिक व्ह्यूज!
समांतर 2

मुंबई : पहिल्या सीझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या (Samantar 2) दुसऱ्या सीझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत या सीरीजला 56 दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेब सीरीज सुरु झाली. ‘समांतर’च्या पहिल्या सीझनच्या यशानंतर दुसरा सीझन ‘एमएक्स प्लेयर’वर 1 जुलै 2021 रोजी दाखल झाला. या वेब सीरीजची निर्मिती जीसिम्सची (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) असून, या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या वेब सीरीजला दर्जा मिळवून दिला आहे. या वेब सीरीजच्या दुसऱ्या भागामध्ये रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस व्यक्तीमत्व सई ताम्हणकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.

आम्हाला खात्री होती!

“समांतर-2’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की, मी माझ्या करिअरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे, त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” असे उद्गार अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले आहेत. स्वप्नील या मालिकेत ‘कुमार महाजन’ या प्रमुख व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहेत.

यावेळी स्वप्नील जोशी याने पहिल्या सीझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये 13 दिवस कशी अडकून पडली होती, याची आठवण उधृत केली आहे. “कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट 2019मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. आम्ही तेव्हा ‘समांतर-1’चे चित्रिकरण कोल्हापूर येथे करत होतो. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल 13 दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी अर्जुन आणि कार्तिक यांनी संपूर्ण चमूची काळजी घेत आम्हा कोणालाही कशाचाही त्रास होणार नाही, याची काळजी घेत होते. ते दिवस विसरता येण्यासारखे नाहीत. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो,” असे स्वप्नील म्हणाला.

(Samantar 2 web series got 56 million views 15 days)

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या घरात अनिरुद्धच्या भावाची एंट्री, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार अविनाश देशमुख!

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI