प्रिया बापटचा बोल्ड सीन व्हायरल

प्रिया बापटचा बोल्ड सीन व्हायरल


मुंबई : प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर अशी तगडी स्टारस्ट असलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजचं मूळ कथानक हे राजकारणावर आधारित आहे. मात्र या कथानकापेक्षा किंवा दहा एपिसोड्सच्या या वेबसीरिजमध्ये जास्त चर्चा रंगतेय ती यातील एका मिनिटाच्या सीनची…

नेहमी शांत, सोज्वळ भूमिकेत दिसणाऱ्या प्रिया बापटनं या वेबसीरिजमध्ये एक बोल्ड सीन दिलाय. प्रियाच्या बोल्ड सीननं या वेबसीरिजला जास्तच चर्चेत आणलंय. प्रियाला या बोल्ड रुपात पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सिटी ऑफ ड्रीम्समध्ये गीतिका त्यागीसोबत असलेल्या प्रियाच्या या बोल्ड सीनमुळं तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय.

एका मिनिटाच्या ‘त्या’ सीनवरुन तुम्ही कोणाचं चारित्र्यावर बोट ठेवू नका. मी एक कलाकार म्हणून माझं काम केलं आणि ते त्या कथानकाची गरज होती म्हणून केलं, असं प्रियाने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मी कधीच प्रत्युत्तर दिलेलं नाही. या आधीही माझ्या कपड्यांवरून मला ट्रोल करण्यात आलं होतं. मी छोटे कपडे का घालते? असे प्रश्न मला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आले. पण यावर काहीही प्रतिक्रिया न देता आपण आपले काम केले पाहिजे असे मला वाटतं. प्रेक्षकांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज पाहिली तरच यात हे बोल्ड दृश्य का आहे हे लोकांना कळेल, असेही प्रियाने ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

प्रियानं या वेबसीरिजमध्ये दमदार अभिनय केला आहे. ही वेबसीरिज प्रियाच्या आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि जबाबदार मुलीची व्यक्तिरेखा प्रिया या वेबसीरिजमध्ये साकारत आहे. यात पौर्णिमा गायकवाडच्या एक व्यक्ती म्हणून असलेल्या अनेक छटा प्रेक्षकांपर्यँतच पोहचवण्यात प्रिया यशस्वी झालीय हे नक्की..

पाहा व्हिडीओ :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI