AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money Heist 5 Teaser | प्रतीक्षा संपली, मनी हाईस्टचा पाचवा सीजन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

स्पॅनिश वेब सीरीज 'मनी हाईस्ट'चे (Money Heist 5) आतापर्यंत चार भाग रिलीज झाले आहेत. गुन्हेगारी आणि ड्रामावर आधारित या वेब सीरीजला ओटीटीवर रिलीज झालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट वेब सीरीज देखील म्हणतात.

Money Heist 5 Teaser | प्रतीक्षा संपली, मनी हाईस्टचा पाचवा सीजन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Money Heist
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jul 27, 2021 | 10:29 AM
Share

Money Heist 5 Teaser  : स्पॅनिश वेब सीरीज ‘मनी हाईस्ट’चे (Money Heist 5) आतापर्यंत चार भाग रिलीज झाले आहेत. गुन्हेगारी आणि ड्रामावर आधारित या वेब सीरीजला ओटीटीवर रिलीज झालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट वेब सीरीज देखील म्हणतात. या वेब सीरीजचा 5वा भाग या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकताच, 26 जुलै रोजी या वेब सीरीजचा टीझर लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की या मालिकेच्या पाचव्या भागाचा ट्रेलर 2 ऑगस्टला लाँच होणार आहे.

पाहा वेब सीरीजचा टीझर

View this post on Instagram

A post shared by Álvaro Morte (@alvaromorte)

जिथे संपला 4 सीझन, तिथूनच सुरु होणार…

तोच देखावा टीझरमध्ये स्पष्टपणे दर्शवला गेला आहे, जिथे चौथा भाग संपला. म्हणजेच, प्राध्यापकाचे रहस्य उघड झाले आणि तो त्याच्या सिक्रेट अड्ड्यावर पकडला गेला. टीझरमध्ये प्राध्यापक लोखंडी साखळीने बांधलेला दिसत आहेत. अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, 2 ऑगस्ट रोजी ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर या वेब सीरीजचा पाचवा भाग यावर्षी डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणार आहे. सुपरहिट वेब सीरीज ‘मनी हाईस्ट’ मध्ये स्पॅनिश अभिनेता अल्वारो मॉर्टे ‘सर्जिओ मार्क्विना’ नावाच्या प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसला आहे.

5व्या सीझनमध्ये मनोरंजनाची मेजवानी

या वेब सीरीजमध्ये दिसणार्‍या सर्व पात्रांची नावे जगातील बड्या शहरांच्या नावावर ठेवली गेली होती. यामध्ये टोकियो, बर्लिन, मॉस्को, नैरोबी, रिओ, डेन्व्हर आणि हेलसिंकी या नावांचा समावेश आहे. या मालिकेत असे दिसून आले आहे, की प्राध्यापक अतिशय कठोर विचारशील होते आणि त्यांनी ‘रॉयल ​​मिंट ऑफ स्पेन’ आणि ‘बँक ऑफ स्पेन’ मध्ये त्याच्या टीमसह चोरी करून अतिशय मनोरंजक आणि शिताफीने बाहेर पडतात. तथापि, आता हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल की, प्रोफेसर आणि त्यांची टीम मनी हाईस्टच्या 5 व्या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी काय मेजवानी देते….

(Money Heist 5 Teaser launch The fifth season of Money Heist will be coming soon)

हेही वाचा :

Ani Kay Hava : जुई आणि साकेत लवकरच भेटीला, ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा

Binge Watch : ‘चुट्ज़पाह’ ते शिल्पा शेट्टीच्या ‘हंगामा 2’पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ‘विकेंड’ मेजवानी!

Bigg Boss OTT | यावेळी शोमध्ये असा कंटेंट असणार जो टीव्हीवर होईल बॅन, ‘बिग बॉस ओटीटी’ची धमाकेदार घोषणा!

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच