AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Sunil Grover | स्ट्रगलर ते ‘गुत्थी’ बनण्यापर्यंतचा संघर्षमयी प्रवास, वाचा अभिनेता सुनील ग्रोव्हरबद्दल…

एक काळ होता जेव्हा तो दिवसभर काम करायचा आणि त्याला महिन्याला अवघे 500 रुपये मिळत होते. पण, त्याने कधीही हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिला.

Happy Birthday Sunil Grover | स्ट्रगलर ते ‘गुत्थी’ बनण्यापर्यंतचा संघर्षमयी प्रवास, वाचा अभिनेता सुनील ग्रोव्हरबद्दल...
सुनील ग्रोव्हर
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) सद्यघडीला एक लोकप्रिय स्टार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, त्याला इथवर पोहचण्यासाठी भरपूर मेहनत करायला लागली आहे. एक काळ होता जेव्हा तो दिवसभर काम करायचा आणि त्याला महिन्याला अवघे 500 रुपये मिळत होते. पण, त्याने कधीही हार मानली नाही आणि कठोर परिश्रम करत राहिला. सुनीलने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘गुत्थी’ बनल्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. सुनील म्हणालेला की, प्रेक्षकांना त्याचे हे पात्र इतके आवडेल, याची त्याला देखील खात्री नव्हती.

आपल्या संघर्षाबद्दल बोलताना सुनील म्हणाला होता, ‘थिएटरमध्ये मास्टर्स पूर्ण केल्यानंतर मी अभिनयासाठी मुंबईला आलो. पण एक वर्ष मी पार्टी करत राहिलो. मी एका पॉश भागात राहत होतो आणि माझी सर्व बचत संपली होती. मी त्यावेळी फक्त 500 रुपये महिना कमवत असे. पण मला माहित होते की, मी लवकरच यशस्वी होईन.’ सुनील म्हणाला होता की, मला माहित आहे की मी अभिनय करू शकतो, कारण एकदा शाळेच्या एका कार्यक्रमात मुख्य पाहुण्याने त्याला सांगितले की तू नाटक स्पर्धेत भाग घेऊ नकोस, कारण हे इतर लोकांवर अन्यायकारक ठरेल.

वडिलांच्या अनुभवातून धडा घेतला

सुनील म्हणाला की, त्याला नंतर कळले की, मुंबईत त्यांच्यासारखे इतर हजारो लोक आहेत, जे त्यांच्या शहरात सुपरस्टार होते आणि येथे येऊन संघर्ष करत आहेत. मात्र, त्याच्या वडिलांच्या अनुभवाचा विचार करून तो स्वतःमध्ये धैर्य आणायचा. सुनीलने सांगितले होते की, त्याच्या वडिलांना रेडिओ उद्घोषक व्हायचे होते, पण त्यांना दादांच्या विरोधामुळे जाता येत नसल्याने त्यांना बँकेत काम करावे लागले. वडिलांप्रमाणे स्वप्न पूर्ण न होण्याचे दु:ख त्याने नेहमीच जवळून पहिले होते.

तो म्हणाला होता, ‘मी माझ्या स्वप्नांना अशा प्रकारे जाऊ देऊ शकलो नाही. म्हणून मी स्वतःची काळजी घेतली आणि काम शोधू लागलो. पण मार्ग तितका सोपा नव्हता. एकदा माझी एका टीव्ही शोसाठी निवड झाली. मग एक दिवस मला सांगण्यात आले की, मला या शोमधून बदलण्यात आले आहे.’

मोठा ब्रेक कधी मिळाला?

एकदा सुनीलने एका रेडिओ शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली, जे व्हायरल झाले आणि त्यानंतर निर्मात्यांनी ठरवले की, त्याचा हा शो देशभरात प्रसारित होईल. सुनीलने सांगितले होते, ‘मला रेडिओमध्ये मग टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम मिळाले. मग, मला गुत्थीची भूमिका मिळाली आणि काही काळातच मी खूप प्रसिद्ध झालो.

सुनील म्हणाला होता, ‘मला आठवतंय की मला लाईव्ह शोसाठी बोलावण्यात आलं होतं आणि जेव्हा मी स्टेजवर गेलो होतो, तेव्हा लोक माझ्यासाठी हट्ट करत होते. मी पाहिले की ज्यांच्यासाठी प्रत्येकजण टाळ्या वाजवत आहे, ते इतर कोणासाठी नाही तर माझ्यासाठी आहे.’

सुनील पुढे म्हणाला होता की, ‘एक तरुण मुलगा ज्याने कधीही अपयशांना त्याच्या स्वप्नांच्या मार्गात येऊ दिले नाही आणि तो जिंकला. त्यामुळे मी आतापर्यंत इतका दूर आलो असलो तरी, हा तरुण मुलगा अजून पुढे जायचा आहे.

मग प्रत्येकाची मने जिंकणारा डॉ. मशूर गुलाटी

गुत्थीनंतर, सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माच्या शोमध्ये ‘डॉ मशूर गुलाटी’ आणि ‘रिंकू देवी’ची भूमिका केली आणि प्रेक्षकांना त्याचे हे दोन्ही अवतार आवडले. चाहते अजूनही कपिलच्या शोमध्ये सुनीलच्या परतण्याची वाट पाहत आहेत.

चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये व्यस्त

सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात सुनील त्याच्या मित्राच्या भूमिकेत दिसला होता आणि त्याचे पात्र चांगलेच लोकप्रिय झाले होते. यानंतर, या वर्षी तो वेब सीरीज ‘तांडव’मध्ये दिसला आणि सुनीलने त्यात आतापर्यंतची एक वेगळी शैली दाखवली. सुनील आता चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये लक्ष केंद्रित करत आहे.

(Happy Birthday Sunil Grover actor s journey from struggle to becoming a star)

हेही वाचा :

पुन्हा चालणार ‘जंपिंग जॅक’ची जादू, जितेंद्र करणार पुनरागमन; एकता कपूरनं दिली हिंट

प्रोफेसर अखेर इन्स्पेक्टर अ‍ॅलिसियाच्या ताब्यात, अखेर चोरीचं सत्र संपणार का? पाहा ‘मनी हाईस्ट 5’चा जबरदस्त ट्रेलर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.