AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav: एकेकाळी ताकद, आता मात्र तीच कमजोरी…कर्णधार सूर्यकुमार यादवची खेळी का अपयशी?

Team India Captain Suryakumar Yadav: टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचा सूर हरवल्याची टीका होत आहे. त्याचे चाहते त्यामुळे चिंतेते आहेत. एकेकाळी त्याची जी ताकद होती, तीच आता कमजोरी झाली आहे. का ठरत आहे त्याची खेळी अपयशी?

Suryakumar Yadav: एकेकाळी ताकद, आता मात्र तीच कमजोरी...कर्णधार सूर्यकुमार यादवची खेळी का अपयशी?
सूर्यकुमार यादवImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 19, 2026 | 4:16 PM
Share

Team India Captain Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव गेल्या वर्षी जागतिक क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. त्याला अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्याच्या स्ट्राईक रेटमध्ये मोठी घसरण झाली. सूर्याचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याने टी20 विश्वकप 2026 पूर्वी न्यूझीलंडविरोधात चांगली कामगिरी बजावली होती. सूर्याने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3 अर्धशतक ठोकले. त्याला प्लेयर ऑफ द सीरीज निवडल्या गेले.

विश्वचषकात धमाकेदार सुरुवात

सूर्यकुमार यादवने टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीला दमदार कामगिरी बजावली. टीम इंडियाच्या कर्णधाराने अमेरिकेविरोधातील पहिल्या सामन्यात 49 चेंडूत नाबाद 84 धावा ठोकल्या. यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे सूर्या या संपूर्ण विश्वकपमध्ये कमाल दाखवणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या तीन सामन्यात त्याला चमकदार कामगिरी बजावता आली नाही. नामीबिया यारख्या टीमविरोधात त्याला अवघ्या 12 धावा करून तंबूत परतावं लागलं. तर पाकिस्तान आणि नेदरलँडविरोधात त्याने क्रमश: 32 आणि 34 धावा काढल्या. त्याचा सूर हरवल्याचे मानले जाते.

ताकद ठरली कमजोरी?

कोलंबोतील अवघड धावपट्टीवर सूर्याच्या कामगिरीवर इतके प्रश्न उपस्थित झाले नाही. पण बुधवारी नेटरलँड्सविरोधात अहमदाबाद येथे त्याने 27 चेंडूवर 34 धावा केल्या. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. सूर्याला 13 धावा झाल्या असताना जीवदान मिळाले. पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. तो 14 व्या षटकात काईल क्लेनच्या एका चेंडूवर झेल देऊन बसला. तो सहज षटकार ठोकण्यात माहिर मानल्या जातो. पण आता तीच त्याची कमजोरी मानल्या जात आहे.

षटकारांचा मोह आवरणार का?

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेगवान गोलंदाजाविरोधात गेल्या वर्षी त्याने लेग साईडमध्ये सात झेल दिले होते. या दरम्यान त्याने 14 षटकार ठोकले. तर 2021 पासून ते गेल्या वर्षापर्यंत 2024 पर्यंत त्याने 57 षटकार ठोकले. तर याकाळात तो 9 वेळा तंबूत परतला आहे. सूर्यकुमारची नेमकी ही कमजोरी समोरील संघाने हेरली आहे. त्याला बाद करण्यासाठी त्याच बाजूने गोलंदाजी करत त्याला बाद करण्याची योजना इतर संघ आखत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकाच स्टाईलमध्ये षटकार मारण्याचा मोह सूर्यकुमारला आवरता घ्यावा लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आवडीचा शॉट खेळतानच त्याच्याकडून मोठी चूक होत असल्याने समीक्षक त्याच्यावर नाराज आहेत. ही चूक त्याला दुरुस्त करावी लागेल.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?