Bell Bottom | ‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!

सगळेच चाहते अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

Bell Bottom | ‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!
बेल बॉटम

मुंबई : सगळेच चाहते अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षयने (Akshay Kumar) या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज केला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. ट्रेलरमध्ये लारा दत्ता(Lara Dutta)  न दिसल्यानंतर अभिनेत्री चित्रपटात का दिसत नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

मात्र, जेव्हा ट्रेलर लाँच करण्यात आला, तेव्हा लाराने खुलासा केला की ती या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये चाहते तिला ओळखूच शकले नाहीत. लाराचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहेत. लाराच्या या लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनसाठी मेकअप आर्टिस्टचे कौतुक केले जात आहे.

अभिनेत्री लारा दत्ताचा हा इंदिरा गांधी लूक पाहिल्यानंतर सध्या लारा दत्ता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की, या मेकअप आर्टिस्टला राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे. एका युजरने लिहिले की, ‘बेल बॉटमचा ट्रेलर 5 वेळा पाहिल्यानंतरही मी लारा दत्ताला ओळखू शकलो नाही. मेकअप आर्टिस्टला सलाम.’

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

 

ही मोठी जबाबदारी!

ट्रेलर लाँच करताना लारा दत्ता म्हणाली की, मी चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. मला निर्मात्यांकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की लारा, आम्ही एक चित्रपट बनवत आहोत ज्यात आम्ही तुम्हाला इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी कास्ट करत आहोत. पण, हे पात्र माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती कारण मी एका आयकॉनिक व्यक्तिरेखेचे ​​पात्र साकारत आहे.

‘बेल बॉटम’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, जो रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे. ‘बेल बॉटम’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि लारा दत्ता, हुमा कुरेशी आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

‘रंग दे बसंती’च्या ‘या’ भूमिकेसाठी अभिषेक-फरहानचा नकार, हृतिक रोशनची मनधरणी करण्यासाठी घरी गेलेला आमिर खान!

कोलकाता अश्लील चित्रपट प्रकरण, ‘नॅन्सी भाभी’ने सांगितली या काळ्या जगतातील गुपित!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI